‘महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिकेकडून इतरांनी धडा घ्यावा,’ दिग्गज कलाकाराने केले सरकारचे कौतूक


प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे भारतीय चित्रपट क्षेत्रात मोठे नाव आहे.  सोशल मीडियावर ते खूप सक्रिय असतात. जावेद अख्तर हे, प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर आपले मत व्यक्त करत असतात. अलीकडे जावेद अख्तर यांनी, कोरोना संक्रमणाविरोधात लढणार्‍या महाराष्ट्र सरकार, आणि बीएमसीचे कौतूक करणारे ट्विट केले आहे. जावेद अख्तर यांचे ट्विट व्हायरल झाले असून त्यावर समर्थनार्थ व विरोधी अशा दोनही पोस्ट येत आहे.

संपूर्ण देश कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेला लढा देत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांचे जीव वाचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. तर महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लाटेच्या वेळी सर्वप्रथम लॉकडाऊन घोषित केले आहे. यावरूनच जावेद अख्तर यांनी याबद्दल ट्विट केले आहे.

जावेद अख्तर यांनी ट्वीट केले की, “मला माहिती आहे की, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) इतरांनी धडा घेण्याची खूप गरज आहे. ते पुर्ण क्षमतेने, या कोविडच्या धोक्याविरूद्ध लढत आहेत.”

हे ट्विट वाचल्यानंतर अनेक युजर्सने यावर प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी जावेद अख्तर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले, ‘सर, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत, तुम्ही असे कसे म्हणत आहात?’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘तुम्ही आम्हाला त्यातला एक मुद्दा सांगु शकता, ज्यावरून आपण त्यातून काही शिकू शकतो.’

तर दुसरीकडे एका युजरने त्यांना पाठिंबा देत लिहिले की, ‘कमीत कमी लोक येथे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मरत आहेत आणि लोकांना उपचारही मिळत आहेत.’ एका युजजरने लिहिले, ‘प्रत्येकाला वाटते आहे की,कोरोना लवकर जायला हवा आहे. आता हा एका राज्याचा विषय नाही राहीला आणि कोणाकडूनही शिकण्याची गरज नाही. पाठ थोपटण्याच्या नादातच, आज संपूर्ण देशाची अवस्था बिकट झाली आहे. राज्यांचा विचार न करता, आता संपूर्ण देशाचा विचार करण्याची गरज आहे.’


Leave A Reply

Your email address will not be published.