Tuesday, September 26, 2023

भारीच ना! तब्बल 4 वर्षांनंतर पाहायला मिळाला शाहरुखचा रोमँटिक अंदाज, ‘या’ गाण्यात नयनतारासोबत केला रोमान्स

‘रोमान्स किंग’, ‘बादशाह’ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान ‘जवान’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते त्याच्या या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला होता, ज्यात शाहरुखचे वेगवेगळे लूक पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल झाल्या होत्या. यानंतर सिनेमातील ‘जिंदा बाद’ गाण्याने चाहत्यांना वेड लावले होते. आता चाहत्यांची उत्सुकता वाढवत सिनेमातील शाहरुखचा एक रोमँटिक ट्रॅकही जारी करण्यात आला आहे. रंजक बाब अशी की, ‘चलेया’ नावाच्या या गाण्यात शाहरुख 4 वर्षांनंतर रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

‘जवान’ सिनेमातील ‘चलेया’ गाणे
‘जवान’ (Jawan) सिनेमातील ‘चलेया’ (Chaleya) हे गाणे शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि नयनतारा (Nayanthara) यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या रोमँटिक गाण्यात शाहरुख खान नयनतारासोबत रोमान्स करताना दिसत आहे. हे गाणे सोमवारी (दि. 14 ऑगस्ट) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात शाहरुख रंगीबेरंगी आऊटफिटमध्ये आपले हात बाजूला करत आयकॉनिक पोझसोबत रोमान्सची जादू पसरवत आहे. तसेच, नयनताराचाही सुंदर अंदाज पाहायला मिळत आहे.

हे गाणे पाहून असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, ही रोमँटिक जोडी रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. तसेच, शाहरुख खानने ट्विटरवरही गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “इस्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार.” हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे प्रतिक्रियांवरून दिसत आहे.

दीर्घ काळानंतर दिसला शाहरुखचा रोमँटिक अंदाज
या रोमँटिक गाण्यात शाहरुखचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना बऱ्याच वर्षांनंतर पाहायला मिळाला. त्यामुळे चाहते खूपच उत्साही आहेत. कारण, ‘रोमान्स किंग’ (Romance King) रोमँटिक गाण्यासह परतला आहे. चलेया हे गाणे आणखी दोन तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आले आहे.

खरं तर, ‘जवान’ या सिनेमाचे दिग्दर्शन ऍटली करत आहे. तसेच, या सिनेमाची निर्माती शाहरुखची पत्नी गौरी खान आहे. तसेच, गौरव वर्मा या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. हा सिनेमा पुढील महिन्यात 7 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. (jawan chaleya song release shah rukh khan romancing with nayanthara see video)

महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तिरंगा फडकवत शबाना आझमींनी साजरा केला स्वातंत्र्यदिन, म्हणाल्या, ‘अभिमान…’
सोनालीचे हॉट फोटो पाहून चाहत्याने केली गजब मागणी; म्हणाला, ‘खूप दिवस झाले गं तू…’

हे देखील वाचा