Saturday, September 30, 2023

शाहरुखच्या लेकीने कृतीतून जिंकले मन! भीक मागायला आलेल्या महिलेला मोठ्या मनाने दिले ‘एवढे’ रुपये, Video Viral

बॉलिवूड कलाकार नेहमीच चर्चेत असतात. मात्र, अनेकदा या कलाकारांपेक्षा जास्त चर्चा त्यांच्या मुलाबाळांचीच रंगलेली असते. असेच काहीसे आता सुपरस्टार शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिच्याबाबत घडले आहे. सुहाना नेहमीच तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना सध्या पॅपराजींचीही आवडती बनल्याचे दिसते. कारण, ती जिथेही जाते, तिथे पॅपराजी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पोहोचतात. अशातच सुहानाचा एक लेटेस्ट व्हिडिओ इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे तोंडभरून कौतुक करताना थकत नाहीयेत.

बुक लाँच इव्हेंटमध्ये आईसोबत पोहोचली सुहाना
खरं तर, शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) रात्री सुहाना खान (Suhana Khan) आई गौरी खान (Gauri Khan) हिच्यासोबत पोहोचली होती. यादरम्यान माय-लेकीची स्टाईल सर्वांचे लक्ष वेधत होती. सुहाना यावेळी काळ्या रंगाच्या हॉट डीप नेक वनपीस ड्रेसमध्ये होती. तसेच, गौरी निळ्या रंगाच्या डेनिम आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपसोबत पिवळ्या ब्लेझरमध्ये खूपच सुंदर दिसत होती. दोघांचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला.

पैसे मागणाऱ्या महिलेसोबत सुहानाचे कौतुकास्पद वर्तन
सुहाना खान हिच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक महिला तिच्याकडे पैसे मागण्यासाठी येते. अशात सुहाना तिला हसत हसत पाचशे रुपयांची नोट काढून देते. एकदा पैसे दिल्यानंतर ती महिला पुन्हा सुहानाकडे येते, तेव्हा सुहाना पुन्हा तिला पैसे देते आणि आपल्या कारमध्ये बसते. पैसे मिळताच महिलेचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुहानाचा हा मोठेपणा नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. नेटकरी तिचे मनापासून कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हिचे मन सोन्याचे आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “ही खूप गोड आहे. वडिलांचे संस्कार.” आणखी एकाने लिहिले की, “जसे पप्पा, तशी मुलगी.”

सुहानाचा सिनेमा
सुहाना खान हिच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती लवकरच झोया अख्तर हिच्या ‘द आर्चीज’ या सिनेमातून अभिनयात पदार्पण करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, मिहीर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंदा यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा 1960च्या दशकावर आधारित आहे. (superstar shahrukh khan daughter suhana khan gave money to roadside beggar video viral)

महत्त्वाच्या बातम्या-
एका सिनेमासाठी घेते कोटी मानधन, पण फक्त 1600 रुपयांसाठी आईवर संतापलेली ‘ही’ अभिनेत्री, कारण धक्कादायक
‘दिग्दर्शन D ग्रेड, सिनेमा C ग्रेड; गटर 2…’, प्रसिद्ध अभिनेत्याने सनी देओलच्या सिनेमाला केले ट्रोल

हे देखील वाचा