Thursday, September 28, 2023

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर तिरंगा फडकवत शबाना आझमींनी साजरा केला स्वातंत्र्यदिन, म्हणाल्या, ‘अभिमान…’

मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) आपला भारत देश 76वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या खास दिवसाचा जल्लोष करण्यासाठी 140 कोटींहून अधिक भारतीय सज्ज झाले आहेत. अशातच ऐंशीचे दशक गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर भारतीय तिरंगा फडकवला आहे. शबाना आझमी यांनी द इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2023 सोहळ्यात ध्वजारोहण केले. यावेळी शबाना यांनी मोठे भाष्यही केले.

काय म्हणाल्या शबाना आझमी?
द इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2023 (the indian film festival of melbourne 2023) सोहळ्यात ध्वजारोहण केल्यानंतर शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. त्या म्हणाल्या की, “मला तिरंगा फडकवण्याचा हा सन्मान मिळाला आहे, ज्याचा मला खूप अभिमान आहे. मेलबर्नमध्ये ध्वजारोहण करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही मेलबर्नमध्ये भारतीय सिनेमाचा जल्लोष करण्यासाठी इथे आलो आहोत. मला वाटते की, कलेची कोणतीही हद्द नसते आणि सिनेमा सामाजिक परिवर्तनाचे एक साधन असू शकते.”

मेलबर्नमध्ये फडकवला तिरंगा
शबाना आझम या आर बाल्की (R Balki) दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘घूमर‘ (Ghoomer) या सिनेमाचा भाग आहेत. या सिनेमाचे ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमिअर होत आहे. यावेळी मेलबर्नमध्ये तिरंगा फडकवला (hoisted the tricolor in melbourne) गेला, तेव्हा देशभक्ती आणि एकतेची भावना तेथील लोकांमध्ये पाहायला मिळाली. शबाना आझमी यांनी त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नाही, तर परदेशातही चांगलेच नाव कमावले आहे.

येत्या 20 ऑगस्टपर्यंत चित्रपट महोत्सव
मेलबर्नचा भारतीय चित्रट महोत्सव 2023 जागतिक मंचावर भारतीय सिनेमाच्या विविधतेच्या प्रदर्शनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनला आहे. हा चित्रपट महोत्स्व 11 ऑगस्टला सुरू झाला असून 20 ऑगस्ट रोजी संपेल. (ghoomer fame actress shabana azmi celebrates the indian independence day hosting the tri color at melbourne)

महत्त्वाच्या बातम्या-
सोनालीचे हॉट फोटो पाहून चाहत्याने केली गजब मागणी; म्हणाला, ‘खूप दिवस झाले गं तू…’
सनीच्या Gadar 2चा विषयच खोल! ट्रॅक्टरमध्ये बसून चाहत्यांनी गाठलं थिएटर, आनंद महिंद्रांनीही शेअर केला व्हिडिओ

हे देखील वाचा