बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याने ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून काम केले. शाहरुखला परत पडद्यावर पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. शाहरुख चार वर्षानंतर आपल्या 3 चित्रपटांसोबत मोठ्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री करणार आहे. त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग सुरू असताना नवीन माहिती समोर येत आहे. अशात चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढताना दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या ‘जवान’ या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून या चित्रपटाच्या एका सीनची खूपच चर्चा रंगली आहे. सध्या ‘जवान’ चित्रपटाची शूटिंग चेन्नईमध्ये सुरू झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एटली कुमार (Atlee Kumar) हे करत आहेत. त्यांच्या सिनेमातील एका ऍक्शन सीनसाठी ते खूप मोठा सेट बनवत आहेत. या ऍक्शन सीनमध्ये शाहरुख खानसोबत 200 महिला भाग घेणार असून मुंबईमध्ये 200 ते 250 महिलांशी चर्चा करण्यात आली आहे. या सीनमध्ये महिलांची गर्दी दाखवणार आहेत. तसेच, हा सीन चेन्नईमध्येच शूट होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग 7 दिवस चालणार आहे.
‘जवान’ या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत नयनतारा (Nayanthara), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) हेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेन्मेंट करत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2 जूनला जवळच्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एटली कुमारच करणार आहेत. यामध्ये शाहरुख खान दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याने शेवटचे 2018 मध्ये ‘झिरो’ सिनेमामध्ये काम केले होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कमाई केली नव्हती. यानंतर शाहरुख खान पुढच्या वर्षी ‘जवान’व्यतिरिक्त सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवरीला सिनेमाग्रहामध्ये प्रदर्शित होईल, तर ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! कारमधून उतरतानाही आलियाला होतोय त्रास, व्हायरल व्हिडिओत स्वत:ला सांभाळताना दिसली अभिनेत्री
‘सैराट’ फेम प्रिन्स बाबा आला गोत्यात, अभिनेता सुरज पवारला ‘या’ गंभीर गुन्ह्यात होणार अटक?
विकीच्या वडिलांनी उंचावली खानदानाची मान! नॉर्वेत ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने झाला सन्मान