Wednesday, July 3, 2024

प्रकरण आहे गंभीर! जेव्हा जया बच्चन भर रस्त्यात घेतात फोटोग्राफर्सची शाळा

बॉलिवूड अभिनेत्री तसेच अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन त्यांच्या कठोर स्वभावासाठी ओळखल्या जातात. बऱ्याचदा अगदी क्षुल्लक गोष्टींमुळे सुद्धा त्या चिडताना दिसतात. अनेकदा त्यांना आपण फोटोग्राफरवर ओरडतानाही पाहिलं असेल. आता पुन्हा एकदा हेच घडलं आहे. खरं तर, नुकतत्याच काही दिवसांपूर्वी जया फोटोशूट करणार्‍या फोटोग्राफरवर भयंकर चिडल्या होत्या आणि म्हणूनच फोटोग्राफरला त्यांची माफी देखील मागावी लागली होती. चला तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे ते.

जया बच्चन या नुकत्याच दंत चिकित्सालयात गेल्या होत्या. दरम्यान, कारमधून बाहेर पडल्यानंतर फोटोग्राफर्स त्यांचे फोटो काढू लागले. परंतु यादरम्यान, जया बच्चन यांनी जेव्हा छायाचित्र काढताना त्या फोटोग्राफर्सना पाहिलं तेव्हा त्या भयंकर चिडल्या. जया या प्रचंड रागात होत्या. त्यांनी फोटोग्राफर्सना सुनावलं की, “तुम्ही लोक इथपर्यंतही पोहोचता”, त्यावर उत्तर देताना फोटोग्राफर्स म्हणाले की, “आम्ही येथे आपली कार पाहण्यासाठी आलो होतो.”

त्या भडकल्यामुळे फोटोग्राफरने त्यांची माफी मागितली. जया बच्चन यांची अशा प्रकारे भडकण्याची काही पहिलीच वेळ नाहीये.

एकदा कॉफी विथ करण या शोमध्ये जेव्हा करण जोहरने श्वेता आणि अभिषेकला जया बच्चन यांच्या अशा प्रकारच्या वागण्याबद्दल विचारलं होतं तेव्हा ते दोघेही म्हणाले होते की, “जया बच्चन यांना क्लॉस्ट्रोफोबिया आहे. ही अशी मानसिक स्थिती आहे ज्यात एखादी व्यक्ती गर्दीमुळे अचानक अस्वस्थ होते. कधीकधी त्यांना भयंकर राग येतो. हे मार्केटमध्ये, गर्दीमध्ये, वाहने किंवा लिफ्टमध्येही जाणवू शकते. त्यांना पुश करणं किंवा स्पर्श करणं देखील आवडत नाही. तसेच, कॅमेर्‍याच्या फ्लॅश डोळ्यांत पडल्यावर त्यांना आणखीन त्रास होतो.”

आता हे कारण जाणून घेतल्यावरही फोटोग्राफर्स काही बच्चन कुटुंबाचा किंबहुना जया बच्चन यांची पाठलाग करणं त्यांचे फोटोज काढणं सोडणार नाहीत हे नक्की. त्यामुळे भविष्यात अनेकदा आपल्याला जया बच्चन यांचं हेच रौद्र रूप पाहायला मिळू शकतं.

हे देखील वाचा