Tuesday, April 23, 2024

‘माझ्यापासून लांब राहायचे’ म्हणत जया बच्चन यांचा पुन्हा चढला पारा, रागात पापाराझींना दिली धमकी

जया बच्चन यांना आता अतिशय चिडखोर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांची ही नवीन ओळख त्यांच्या चिडखोर स्वभावामुळेच तयार झाली आहे. त्या सतत मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर जेव्हा येतात तेव्हा रागातच असतात. त्यांच्या रागाचे किंवा मीडियावर भडकून त्यांना सुनावत असण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता पुन्हा एकदा सर्वांना त्यांच्या रागाचा प्रत्यय आला आहे. नुकतेच पामेला चोप्रा यांचे निधन झाले. त्यांच्या अशा आकस्मिक निधनाचा सर्वांनाच मोठा झटका बसला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडकरांनी आदित्य चोप्राच्या घरी एकच गर्दी केली होती. तेव्हा जया देखील मुलगी श्वेताला घेऊन तिथे पोहचल्या, त्यावेळेस त्या पुन्हा एकदा रागात दिसल्या.

जया बच्चन यांना येणारा राग पाहून प्रत्येक जणं आश्चर्य व्यक्त करत आहे. जिथे पापराजी दिसतील तिथे त्या भडकतात. जेव्हा जया बच्चन आदित्य चोप्राच्या घरी पोहचल्या तेव्हा तिथे मीडिया होतीच. जया यांना पाहून मीडियाचे लोक त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे आले ते पाहून त्या रागात म्हणाल्या, “माझ्यापासून लांब राहायचे.” एका व्हिडिओमध्ये त्या कॅमेरामॅनला त्यांचे फोटो काढण्यापासून थांबवताना दिसत आहे. त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यात त्या म्हणतात “खूप झाले आता… मागे व्हा..”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जया बच्चन यांचा मीडियासोबतचा व्यवहार पाहून अनेक नेटकऱ्यांनी नाराज व्यक्त केली आहे. काहींनी तशा कमेंट्स देखील केल्या आहेत. एकाने लिहिले, “माध्यामांचा शत्रू…”, दुसऱ्याने लिहिले, ‘त्यांना नक्की त्रास तरी कोणता आहे.”, अजून एकाने लिहिले, “विनाकारण एवढा गर्व आहे.” त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असला तरी त्यांचा जुना मीडियावर चिडलेला व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

जया बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, त्या लवकरच रॉकी और राणी की प्रेमकहाणीमध्ये झळकणार आहे. येत्या जुळ्या महिन्यात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

हे देखील वाचा