Tuesday, July 1, 2025
Home बॉलीवूड Jayeshbhai Jordar | रिलीझपूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला रणवीरचा चित्रपट, ‘त्या’ सीनवरून वाद निर्माण

Jayeshbhai Jordar | रिलीझपूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला रणवीरचा चित्रपट, ‘त्या’ सीनवरून वाद निर्माण

रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या गुजराती पार्श्वभूमीवर आधारित ‘जयेशभाई जोरदार’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून, हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंगचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत. पण या चित्रपटाबाबत अशा बातम्याही समोर येत आहेत, ज्यामुळे रणवीर सिंगच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘जयेशभाई जोरदार’ वादात सापडला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनवरून हा वाद निर्माण झाला होता. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण…

ट्रेलर ‘त्या’ सीनवरून वाद
‘जयेशभाई जोरदार’चा ट्रेलर रिलीझ होताच चर्चेत आला होता. मात्र आता त्याच्या एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात, रणवीर एका गुजराती मुलाची भूमिका साकारत आहे, ज्याच्या पालकांना आपल्या सुनेकडून मुलगा हवा होता. ट्रेलरमध्ये एक सीन आहे, ज्यामध्ये रणवीर सिंगच्या जयेशभाईच्या पात्राचे पालक त्यांच्या गर्भवती सुनेला लिंग निर्धारण चाचणी करण्यासाठी घेऊन जातात. तर चित्रपटात जयेशभाईच्या आई-वडिल ठरवतात की, मुलगी झाली तर तिला मारून टाकू. (jayeshbhai jordaar lands in legal trouble over gender determination scene)

रणवीर सिंगचा चित्रपट आला वादाच्या भोवऱ्यात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कोर्टामध्ये रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या ट्रेलर विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणार्‍या पवन प्रकाश पाठक यांनी याचिकेत म्हटले आहे की, “प्रसूतीपूर्वी लिंग चाचणी करणे बेकायदेशीर आहे आणि आपली राज्यघटना त्याला परवानगी देत ​​नाही.” चित्रपटाच्या माध्यमातून अशा गोष्टी सर्वसामान्यांना दाखवू नयेत आणि निषिद्ध कृत्यांचा प्रचार करत असल्याच्या कारणावरून चित्रपटातून हा सीन हटवण्यात यावा, अशी त्यांची इच्छा आहे.

ट्रेलरला मिळतेय वाहवा!
चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाल्यानंतर जेव्हा या चित्रपटाच्या कथेची कल्पना सर्वांसमोर आली, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले. आजही आपल्या देशात कुठेतरी सुरू असलेल्या अशा सामाजिक समस्येभोवती हा चित्रपट विणलेला आहे. रणवीर सिंगच्या व्यक्तिरेखेचे ​​चाहत्यांकडून खूप कौतुक केले गेले, जो आपल्या न जन्मलेल्या मुलासाठी कठोर संघर्ष करतो आणि त्याला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. तो यात बाप म्हणून कर्तव्य बजावताना दाखवला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा