Sunday, May 26, 2024

चित्रपटांमध्ये आपल्या लुक्ससोबत नेहमीच प्रयोग करणाऱ्या रणवीर सिंगच्या ‘या’ लूकने मिळवली वाहवा

बॉलिवूडचा सर्वात जास्त एनर्जेटिक अभिनेता म्हणून रणवीर सिंग ओळखला जातो. त्याची एनर्जी ही त्याची दुसरी ओळख आहे. आपल्या दमदार अभिनयाने, डान्सने आणि गुडलुक्सने तो नेहमीच सर्वांचे लक्ष आकर्षित करत असतो. याशिवाय रणवीरची अजून एक ओळख म्हणजे त्याचे अतरंगी कपडे. रणवीर नेहमीच अतिशय वेगळ्या आणि विचित्र कपड्यांसाठी ओळखला जातो. यामुळे अनेकदा त्याला ट्रोल देखील केले जाते मात्र तरीही तो त्याला आवडेल तसेच राहतो. लवकरच तो ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटलेला आला आहे. सिनेमासोबतच रणवीरच्या लूकची देखील खूप चर्चा होताना दिसत आहे. रणवीर नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळे लूक तरी करत असतो. सिनेमांसोबतच त्याच्या हटके लुक्सच्या देखील भरपूर चर्चा ऐकायला मिळतात. आता या नवीन सिनेमाचेच घ्या या सिनेमात तो एका गुजराती मुलाची भूमिका साकारत आहे. त्यासाठी त्याने त्याचे केस एकदम चिपकू केले आहेत. आज या लेखातून जाणून घेऊया रणवीरच्या अशा काही सिनेमातील हटके लुक्सबद्दल.

चित्रपटाचे नाव – पद्मावत
भूमिका – अलाउद्दीन खिलजी
संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ हा सिनेमा वादांमुळे सर्वाधिक गाजला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. या सिनेमात रणवीर सिंगने नकारात्मक भूमिका साकारली होती. तो सिनेमात ‘अलाउद्दीन खिलजी’च्या भूमिकेत दिसला. अतिशय क्रूर आणि अत्याचारी असणाऱ्या या भूमिकेला रणवीरने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसवले. या भूमिकेसाठी त्याचा लुक देखील वेगळा होता. त्याने दाढी वाढवत डोळ्यात जाड काजल देखील घातले होते.

चित्रपटाचे नाव – सिम्बा
भूमिका – संग्राम सिम्बा
२०१८ साली आलेल्या रोहित शेट्टी यांच्या ‘सिम्बा’ सिनेमात देखील रणवीरचा एक वेगळाच लूक दिसला. यात त्याने एका पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. आपला लूक पूर्ण करण्यासाठी त्याने बारीक मिशी लावली होती जी तो सिनेमात ताणताना देखील दिसला.

चित्रपटाचे नाव – बाजीराव मस्तानी
भूमिका – पेशवा बाजीराव
संजय लीला भन्साळी यांच्या २०१५ साली आलेल्या या सिनेमात रणवीर बाजीराव पेशवा यांच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेसाठी रणवीरने त्याचे संपूर्ण केस काढत टक्कल केले होते. सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होत्या.

सिनेमाचे नाव – गोलियों की रासलीला: राम-लीला
भूमिका – राम
संजय लीला भन्साळी यांच्या २०१३ साली आलेल्या या सिनेमात देखील रणवीरचा हटके लूक पाहायला मिळाला. यात त्याने गुजराती मुलाची भूमिका साकारली होती, ज्याचे सिल्की मोकळे केस आणि रंगबेरंगी कपडे खूपच भाव खाऊन गेले.

चित्रपटाचे नाव – 83
भूमिका – कपिल देव
मागच्यावर्षी प्रदर्शित झालेल्या भारताच्या क्रिकेटमधील पहिल्या विश्वविजयावर आधारित या सिनेमात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी रणवीरने मेकअपचा वापर करत संपूर्ण लूकच बदलला होता. कुरळे केस, डार्क त्वचा, मिशा आदी गोष्टींमुळे तो अगदी कपिल देवच दिसत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा