Dolly Sohi Death | मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बटमो समोर येत आहे, ती म्हणजे ‘झनक’ फेम डॉली सोही (Dolly Sohi Death) हिचे निधन झाले आहे. तिची बहीण अमनदीप सोही हिच्या निधनानंतर या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. यकृताच्या समस्येमुळे अमनदीपचा मृत्यू झाला आणि काही मिनिटांनी त्याची बहीण आणि अभिनेत्री डॉली यांचेही निधन झाले. डॉलीने वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. डॉली सोही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा देत होती.
डॉली सोही आणि अमनदीप सोही या बहिणींच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रींच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉलीच्या निधनाची बातमी शेअर करताना कुटुंबीयांनी सांगितले की, आमची लाडकी डॉली आज पहाटे तिच्या स्वर्गीय निवासासाठी निघाली आहे. तीच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिनेत्रीचा भाऊ मनू सोही याने अमनदीप सोहीच्या मृत्यूनंतर सांगितले होते की, त्यांची बहीण डॉलीची प्रकृती सध्या गंभीर नाही. मात्र डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात विश्रांती घेण्यास सांगितले आहे. मात्र, आज, गुरुवार, 8 मार्च रोजी सकाळी डॉलीचेही निधन झाले. अभिनेत्रीला गेल्या वर्षी 2023 मध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.
डॉली सोहीने जानेवारीमध्ये खुलासा केला होता की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे तिला ‘झनक’ या मालिकेच्या शूटिंगमधून ब्रेक घ्यावा लागला होता. डॉली आत्तापर्यंत अनेक मालिकांचा भाग होती. ‘भाभी’, ‘कलश’, ‘मेरी आशिकी तुम से ही’, ‘खूब लडी मर्दानी’ आणि ‘झांसी की रानी’ सारख्या शोमध्ये तिने काम करून लोकांमध्ये ओळख मिळवली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘तरुणांमधील चिंतेला इंटरनेट जबाबदार’, जया बच्चन यांच्या वक्तव्याने पुन्हा उडाली खळबळ
प्री-वेडिंगनंतर राधिकाने पहिल्यांदाच दिले स्टेटमेंट; म्हणाली, ‘हे सौभाग्य सर्वांनाच मिळत नाही’