Tuesday, April 23, 2024

‘तरुणांमधील चिंतेला इंटरनेट जबाबदार’, जया बच्चन यांच्या वक्तव्याने पुन्हा उडाली खळबळ

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. प्रत्येक मुद्द्यावर त्या आपले मत उघडपणे मांडत असतात. मात्र, जया बच्चन सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. असे असूनही त्यांची विधाने नेहमीच चर्चेत असतात. सध्या जया बच्चन तिची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या सीझन 2’ मध्ये दिसत आहे. नुकताच या शोच्या नवीन भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये जया बच्चन चिंतेबद्दल बोलताना दिसत आहेत.

‘नव्या’च्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी इंटरनेटचे फायदे आणि तोटे याविषयी चर्चा केली आणि सांगितले की, तरुणांमध्ये चिंतेचे मूळ कारण त्यांना ऑनलाइन मिळणारी जास्त माहिती आहे. जया म्हणाल्या की, तरुणांवर नेहमी कॉल्सचे उत्तर देणे, त्यांच्या मोबाइलवरील मेसेजला प्रतिसाद देणे यासाठी खूप दबाव असतो

पुढे, नव्याने तिच्या आजीला विचारले की जुनी पिढी कमी तणावग्रस्त आहे का, ज्यावर जया लगेच म्हणाल्या की, जुन्या पिढीतील लोक नक्कीच कमी तणावग्रस्त असतात. नव्याने पुढे तिच्या आजीला सांगितले की तिला कधीही तणाव वाटत नाही. यावर जया म्हणाली, ‘तुला वाटत नाही की तू तणावात आहेस पण तू आहेस.’

त्या पुढे म्हणाल्या की, “आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही चिंतेबद्दल ऐकले नव्हते. बालपण विसरा, हे आपण आयुष्यातही ऐकले नाही. ते कुठून येते? हे घडते कारण तुम्हाला सतत माहिती दिली जाते. ही मुलगी कशी दिसते, ती कुठून आली? ती तिचा मेकअप कसा करतेय?’ यामुळे चिंता निर्माण होते.” अशापराकारे त्यांनी तरुणांमध्ये येणारे टेन्शन हे त्यांना सोशल मीडियामुळे येते असे सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

खलनायकाची भूमिका करायची आहे समजल्यावर अशी होती आर. माधवनची प्रतिक्रिया, अभिनेत्याने केला खुलासा
प्री-वेडिंगनंतर राधिकाने पहिल्यांदाच दिले स्टेटमेंट; म्हणाली, ‘हे सौभाग्य सर्वांनाच मिळत नाही’

हे देखील वाचा