पाहा व्हिडीओ- बहुचर्चित ‘रुही’ सिनेमातील पहिले गाणे रिलीझ, ‘पनघट’ गाण्याला चार तासांत लाखो हिट्स


बॉलिवूड सिनेमांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील गाणी. कधी कधी सिनेमा जरी फ्लॉप झाला, तरी गाणी मात्र हिट असतात. कधी कधी केवळ सिनेमातील गाण्यांमुळे देखील प्रेक्षक चित्रपटगृहांपर्यंत येतात. त्यामुळे सिनेमाची संपूर्ण टीम संपूर्ण चित्रपटासोबतच गाण्यांवर देखील प्रचंड मेहनत घेते. सध्या सोशल मीडियावर राजकुमार राव, जान्हवी कपूर आणि वरूण शर्मा यांच्या ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर धुमाकूळ घालत आहे. या हॉरर कॉमेडी सिनेमाने प्रदर्शनाआधीच ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

लवकरच या सिनेमाचे पहिले गाणे प्रदर्शित होणार आहे. ‘पनघट’ नावाचे हे गाणे २२ फेब्रुवारीला लाँच होणार आहे. याबद्दल जान्हवीने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर करत याबद्दल माहिती दिली आहे. जान्हवीने तिच्या पोस्टमध्ये या गाण्याचा काही सेकंदाचा टिझर पोस्ट करत लिहिले, “क्यो! पनघट हे गाणे सोमवारी प्रदर्शित होत आहे.”

 

या गाण्याच्या टीझरमध्ये जान्हवी कपूर लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये घुंघट घेऊन दिसत आहे. तर लग्नाच्या तयारीत असलेले राजकुमार आणि वरूण हातात वरमाला घेऊन लग्नासाठी तयार दिसत आहे. पुढच्या सेकंदाला ती तिचा घुंघट काढते. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. हे गाणे २२ फेब्रुवारीला म्हणजेच सोमवारी लाँच होणार आहे.

‘रुही’ हा सिनेमा येत्या ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे. दिनेश विजन दिगदर्शित २०१८ साली आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. ‘रुही’ सिनेमादेखील दिनेश विजन यांनीच दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा देखील स्त्री सारखाच सुपरहिट होणार यात शंका नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.