हिंदी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘सैराट’, ‘फँड्री’ यांसारखे प्रसिद्ध सिनेमे देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या बहुप्रतिक्षित ‘झुंड’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यांनी ही माहिती एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “येत्या ४ मार्च, २०२२ रोजी ‘झुंड’ चित्रपटगृहात तुमच्या भेटीला येणार आहे.”
https://www.facebook.com/1704772843/posts/10209739750926237/?d=n
याव्यतिरिक्त नागराज यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करूनही आपल्या या आगामी सिनेमाची माहिती दिलीये.
सिनेमात कोणकोण झळकणार?
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) दिसत असून त्यांच्या हातात फुटबॉल आहे. यावरून समजतं की, हा सिनेमा फुटबॉल या खेळावर आधारित आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबतच रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Akash Thosar) यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
काय आहे सिनेमाची कथा?
‘झुंड’ हा एक बायोग्राफिक सिनेमा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहेत, जो रस्त्यावरील मुलांना फुटबॉल संघ तयार करण्यास प्रेरित करतो.
या सिनेमाची निर्मिती टी-सीरीज, तांडव फिल्म्स एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि आटपाट फिल्म्स यांच्या बॅनरखाली झाली आहे. तसेच भूषण कुमार, कृष्ण कुमार, राज हिरेमठ, सविता हिरेमठ, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, संदीप सिंग आणि मीनू अरोरा हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
हेही पाहा- ‘या’ Tollywood कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही, Bollywood मध्येही दाखवलाय जलवा
खरं तर या सिनेमाच्या शूटिंगला २०१८ मध्येच सुरुवात झाली होती. सिनेमा तयार झाल्यानंतर मागील २ वर्षांपासून प्रदर्शनाची वाट पाहत होता. त्यानंतर हा सिनेमा मागील वर्षी १८ जून, २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.
हेही वाचा-