‘जाळ अन् धूर संगटच!’ रिंकू राजगुरूच्या स्टायलिश अंदाजावर उमटतायेत नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे. हे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. हेच कारण आहे की, रिंकूने पोस्ट शेअर करता क्षणीच ती व्हायरल होऊ लागते. नेहमीप्रमाणेच तिचे काही फोटो चाहत्यांनी पुन्हा व्हायरल केले आहेत.

इंस्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या रिंकूने नुकतेच तिचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात चाहत्यांना तिचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे. यात तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोबतच डोळ्यावर लावलेला गॉगल तिचा लूक अधिकच स्टायलिश बनवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

हे फोटो शेअर करत, रिंकू कॅप्शनमध्ये “फ्रेश एअर” अर्थातच ताजी हवा असे लिहिले आहे. नेहमीप्रमाणे तिच्या या फोटोलाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. शिवाय ते फोटोवर कमेंट करून त्यांचे प्रेमही व्यक्त करताना दिसत आहे. कमेंट करत एका युजरने लिहिले, “जाळ अन् धूर संगटच.” तर दुसरा म्हणतोय, “एकदम झक्कास!” याप्रमाणे बऱ्याच कमेंट या फोटोवर तुम्हाला पाहायला मिळतील.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही चांगली कामगिरी करत आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा

Latest Post