Monday, February 24, 2025
Home हॉलीवूड जिने केस लढवली तिलाच पटवली! अभिनेता जॉनी डेपची नवी लवस्टोरी चर्चेत

जिने केस लढवली तिलाच पटवली! अभिनेता जॉनी डेपची नवी लवस्टोरी चर्चेत

काही महिन्यांपूर्वी अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) चांगलाच चर्चेत आला होता. संपूर्ण देशभरात या केसची प्रचंड चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा अभिनेता जॉनी डेप नवीन प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आला आहे. पुर्व पत्नी आणि अभिनेत्री एम्बर हर्डसोबत खटला जिंकल्यानंतर अभिनेता जॉनी डेप पुन्हा प्रेमात पडला आहे. यावेळी जॉनी जिच्या प्रेमात पडला आहे ती वकील आहे. जॉनीची केस लढणाऱ्या टीमचा ती एक भाग होती. जॉनीचे नाव त्याची वकील कॅमिल वास्क्वेजसोबत जोडले जात होते. कॅमिल आणि जॉनीच्या नात्याची सोशल मीडियावर चर्चा होत होती. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार असा दावा करण्यात आला आहे की जॉनीचे कॅमिलीसोबत संबंध नसून दुसऱ्या वकिलासोबत आहे.

रिपोर्ट्सनुसार, जॉनी डेप जोएल रिच नावाच्या वकिलाला डेट करत आहे. द सन विरुद्ध यूके खटल्यात जोएलने जॉनीचे प्रतिनिधित्व केले होते. असे वृत्त आहे की जोएल विवाहित आहे परंतु ती तिच्या पतीपासून वेगळी आहे. त्यांचा घटस्फोट अद्याप झालेला नाही. ती दोन मुलांची आई असल्याचेही सांगण्यात येत आहे.सूत्रांनी यूएस विकलीला सांगितले की जॉनी डेप आणि अटर्नी जोएल रिच त्याच्या रिलेशनबद्दल खूपच सिरीअस आहे.

अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, यूएसमध्ये अम्बर हर्ड प्रकरणाची सुनावणी सुरू असताना जोएल जॉनीच्या कायदेशीर टीमचा भाग नव्हती, परंतु जॉनीच्या समर्थनार्थ व्हर्जिनिया न्यायालयाच्या कारवाईदरम्यान ती तेथे उपस्थित होती. तसेच, “जोएल रिचची व्हर्जिनिया कोर्टात उपस्थिती ही व्यावसायिक जबाबदारी नव्हती. ती वैयक्तिक कारणांसाठी कोर्टात हजर राहायची. काही महिन्यांपूर्वी जॉनी डेप केमिली वास्क्वेजला डेट करू शकतात अशी अटकळ जोर धरू लागली होती. तथापि, कॅमिलीने कठोर विधान करून अफवांचे खंडन केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘त्याने मला ऑफर दिली आणि…’, लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड
अबब! अक्षय कुमारने ‘इतक्या’ कोटींला विकला मुंबईमधील बंगला, परदेशातील संपत्ती पाहून होतील डोळे पांढरे

हे देखील वाचा