Thursday, March 28, 2024

‘त्याने मला ऑफर दिली आणि…’, लोकप्रिय टिव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

सिनेमा जगत हे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचे मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. परंतु बाहेरुन झगमगाटी आणि आकर्षक वाटणाऱ्या सिने जगतात असे अनेक धक्कादायक खुलासे होत असतात. त्यामधील कास्टिंग काऊचच्या प्रकाराची तर नेहमीच चर्चा होत असते. अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली असून लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री कावेरी प्रियमने तिला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. 

कावेरी प्रियम (kaveri priyam) ही हिंदी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक दमदार भूमिकांमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यामध्ये अभिनेत्रीची ‘ये रिश्ते हैं प्यार के’ ही मालिका चांगलीच गाजली होती. कावेरी प्रियमने अलिकडेच कास्टिंग काऊचबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान कावेरीने सांगितले की, अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिला या इंडस्ट्रीत खूप गोष्टींचा सामना करावा लागला होता. इतरांप्रमाणेच तीही अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आल्याचे अभिनेत्रीने सांगितले. तिची व्यथा सांगताना तिने सांगितले की, इथे आल्यावर ऑडिशन कुठे आणि केव्हा घ्यायचे हे तिला काहीच माहीत नव्हते. तिने सांगितले की, सुरुवातीच्या काळात शॉर्टकटच्या माध्यमातून खूप उंची गाठलेल्या अभिनेत्रींबद्दल तिला सांगण्यात आले होते.

अभिनेत्री म्हणाली, “मी ऑटोमध्ये बसले होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू तरळत होते कारण मुंबईत आल्यानंतर मी अभिनेत्री होण्यासाठी खूप कष्ट केले होते. त्यावेळी माझ्याशी अशी वागणूक होत असल्याने मी खूप गोंधळले होते. मी विचार केला की लोक खरोखरच असे असतात का? पण नंतर लक्षात आले की हा चुकीचा मार्ग आहे. नंतर मी रडणे थांबवले आणि ठरवले की माझ्या मेहनतीने मी इंडस्ट्रीत काहीतरी साध्य करेन.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे अडचणीत, दहा वर्षापुर्वीच्या खटल्यात भरावा लागणार दहा लाखांचा दंड
‘सिटाडेल’मधील अ‍ॅक्शन सीनबद्दल प्रियांकाचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘गणित तितकेच सोपे…’
‘धकधक गर्ल’ने वाढवली चाहत्यांच्या ह्रदयाची धडधड! वीस वर्षानंतर ‘डोला रे’ गाण्यावर थिरकली माधुरी, व्हिडिओ व्हायरल

 

 

हे देखील वाचा