‘डोकं घरी ठेवून आला आहात का?’, म्हणत जॉन अब्राहमने साधला पत्रकारावर निशाणा

अभिनेता जॉन अब्राहम (john abraham) सध्या त्याच्या ‘अटॅक’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू असून, हा चित्रपट येत्या ११ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकारावर जॉन चांगलाच संतापलेला दिसून आला. ज्यामुळे जॉन अब्राहमच्या रागीट स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143)

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, अभिनेता जॉन अब्राहम आणि ‘अटॅक’ चित्रपटाची टीम सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित अटॅक चित्रपटात जॉन अब्राहमसोबत प्रकाश राज, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रितसिंग आणि रत्ना शाह असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या दमदार चित्रपटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला असून, यामध्ये जॉन अब्राहमचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. या ट्रेलरवरुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धूमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे. मात्र तत्पुर्वी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहम एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका पत्रकाराने त्याला “तुझ्या चित्रपटात अतिशोयोक्ती दाखवलेली असते, जेव्हा तु २०० लोकांना एकटा मारतोस, गाड्या उचलुन फेकतोस हे काही पटत नाही” असा प्रश्न केला यावर जॉनने “हा प्रश्न अटॅक चित्रपटाबद्दल आहे  का?” असे विचारतो यावर तो “नाही सत्यमेव जयते चित्रपटाबद्दल आहे” असे म्हणतो. यावर उत्तर देताना जॉन “माफ करा मी अटॅक चित्रपटाबद्दल बोलतोय असे म्हणत मी शारिरीक फिटनेसपेक्षा मानसिक फिटनेसकडे लक्ष देतो कारण काही मुर्खांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात” असे म्हणत त्या पत्रकारावर थेट निशाणा साधला आहे. तसेच पुढे बोलताना “तुम्ही तुमचे डोके घरी ठेवून आलाय का?” असा डायरेक्ट हल्ला चढवला आहे. तसेच असे म्हाताऱ्यासारखे प्रश्न न विचारता अटॅक चित्रपटाबद्दल प्रश्न विचारा असा सल्लाही दिला. जॉन अब्राहमच्या या भडकलेल्या पत्रकार परिषदेची सर्वक्ष चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post