Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतोय भरभरून प्रतिसाद

जॉन अब्राहमच्या ‘अटॅक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर मिळतोय भरभरून प्रतिसाद

अभिनेता जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘अटॅक’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाच्या नावावरूनच समजत आहे की, चित्रपटात भरपूर ऍक्शन असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते प्रभावित झाले आहेत.

जॉन अब्राहमच्या या ट्रेलरला सोशल मीडियावर भरपूर प्रतिसाद मिळत आहे. हा ट्रेलर शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “रेडी, सेट फायर, अटॅकचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.” त्याच्या चाहत्यांनी देखील कमेंट करून त्याचा हा ट्रेलर आवडला आहे असे सांगितले आहे.

जॉन अब्राहमच्या या पोस्टवर एका युजरने लिहिले आहे की, “कॅरेक्टरची गोष्टीच वेगळी आहे. ” सगळेजण हा ट्रेलर पाहून अनेक कमेंट करत आहेत. सगळ्यांना आता हा ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. सगळेजण ट्रेलरचे कौतुक करत आहेत.

अटॅक या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत रकुल प्रीत सिंग, जॅकलिन फर्नांडिस, प्रकाश राज आणि रत्ना पाठक दिसत आहेत. हा चित्रपट १ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तसेच तो मोहित सुरी यांच्या एक ‘विलेन रिटर्न्स’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया दिसणार आहेत. जॉन अब्राहम सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होता. तो स्पेनमध्ये या चित्रपटाची शूटिंग करत होता. अशातच तो शूटिंग वरून परत आला आहे. तो विमान तळावर त्याच्या पत्नीसोबत स्पॉट झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा