Saturday, July 6, 2024

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार 100% चित्रपट, नावावरुनच लागली चाहत्यांना उत्सुकता

चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमार आणि अमर बुटाला यांनी साजिद खानच्या दिग्दर्शकीय उपक्रमासाठी 100% या चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, रितेश देशमुख, नोरा फतेही आणि शहनाज गिल दिसणार आहेत. हा विनोदाने भरलेला कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपट भरभरून मनोरंजनाचे आश्वासन देतो. भारतीय विवाहसोहळा आणि हेरांसाठीच्या क्रेझच्या पार्श्वभूमीवर हा साजिद खानचा हा चित्रपट कॉमेडी आणि एक्शनने भरलेला आहे.

जॉन अब्राहम, रितेश देशमुख, नोरा फतेही आणि शहनाज गिल यांच्या चित्रपटाचे १००% शूटिंग २०२३ च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच हा चित्रपट 2023 च्या दिवाळीत प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपट 100%  हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज असोसिएशन मीडिया प्रोडक्शनद्वारे सादर केला जात आहे. साजिद खान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अमर बुटाला यांनी केली आहे.

जॉन अब्राहम, रितेश देशमुख, नोरा फतेही आणि शहनाज गिल असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची आता उत्सुकता लागली आहे. याआधी शहनाज गिल सलमान खानसोबत कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शहनाजच्या या नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही चांगलाच आनंद झाला आहे.

हेही वाचा – अभिनेता रणवीर सिंगची मुंबई पोलिसांकडून दोन तास चौकशी, ‘या’ प्रश्नांचा केला भडिमार
ए आर रहमानचा मोठा सन्मान, कॅनडामधील रस्त्याला दिलं जाणार संगीतकारच नाव
राष्ट्रीय क्रीडा दिन | ‘या’ खेळाडूंच्या बायोपिकने प्रेक्षकांना लावले होते वेड

हे देखील वाचा