Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड मुलांसह नाचताना बिघडला बॅलन्स, अन् पडला धपकन!! पाहा जॉनी लिव्हरचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ

मुलांसह नाचताना बिघडला बॅलन्स, अन् पडला धपकन!! पाहा जॉनी लिव्हरचा ‘हा’ मजेदार व्हिडिओ

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर कदाचित सध्या चित्रपटांपासून दूर असेल, परंतु त्याच्या विनोदी स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकण्यात तो कसलीही कसर सोडत नाही. जॉनीबरोबरच त्याची मुले जेमी आणि जेस्सीसुद्धा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टविषयी चर्चेत असतात.

काही दिवसांपूर्वी जॉनी लीव्हर ‘डोन्ट टच मी’ गाण्यावर मुलांसमवेत नाचताना दिसला होता. नुकताच, जेमीने डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जेमी आणि जेस्सी वडील जॉनीसोबत डान्स करताना दिसत आहेत. यासह व्हिडिओमध्ये, संतुलन बिघडल्यामुळे जॉनी लिव्हर पलंगावरुन खाली पडतानाही दिसला आहे.

जेमीने शेअर केलेला हा व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. तसेच युजर्स व्हिडिओवर जोरदार कमेंट्सही करत आहेत. या व्हिडिओमध्ये तिघांची स्टाईल खरोखरच अप्रतिम आणि पाहण्यासारखी आहे.

व्हिडिओ शेअर करत जेमीने लिहिले की, “आमच्या डोन्ट टच मी डान्सचे बीटीएस फुटेज. ते तुमच्याबरोबर शेअर केले जावे.” तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, “तुझे वडील एक उत्तम अभिनेते आहेत आणि तुम्ही दोघेही त्यांच्या पावलांवर चालत आहात. आपल्या दोघांनाही मोठ्या पडद्यावर पाहण्याची खूप इच्छा आहे.” या व्यतिरिक्त एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत “सर्वोत्कृष्ट त्रिकूट” असे लिहिले.

जॉनी लिव्हरने त्याची मुले जेमी आणि जेस्सीसह व्हिडिओमध्ये धमाल करण्याची ही पहिली वेळ नाही. एकीकडे जॉनीने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही, तर दुसरीकडे त्याची मुलंसुद्धा आपल्या कौशल्याने चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतात.

जॉनीची मुलगी जेमीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने 2012 मध्ये स्टँडअप कॉमेडियन म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. तिने बॉलिवूडमध्ये ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल 4’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये तिने चंपा आणि गिगलीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

-अक्षरा सिंगने मारला डोळ्यांचा बाण, तर चाहत्यांच्या हृदयावर झाला जोरदार वार!

हे देखील वाचा