बीग बॉस चौदामध्ये तिसऱ्या स्थानावर राहिलेली निक्की तांबोळी आहे तरी कोण? वाचा थोडक्यात


बिग बॉसचा 14 वा सीजन नुकताच संपला आहे. या सीजनमधील भव्य फिनाले सोहळ्यात शोचा विजेता घोषित करण्यात आला. रुबीना दिलैक विजेती तर राहुल वैद्य उपविजेता ठरला. तसेच निक्की तांबोळी तिसऱ्या क्रमांकावर होती. या शोची एक पावरफुल स्पर्धक म्हणून निक्कीची ओळख निर्माण झाली आहे. साडेचार महिन्यापूर्वी जेव्हा शो सुरू झाला, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की निक्की चक्क टॉप 3 मध्ये पोहचेल.

जेव्हा निक्की पहिल्यांदा बिग बॉसच्या स्टेजवर पोहचली, तेव्हा तिच्या खास स्टाईलने तिने प्रेक्षकांसमवेत सलमान खानचेही मन जिंकले.निक्कीने स्वतःला बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री असल्याचे सांगितले. ती अविवाहित आहे असेही ती म्हणाली. तसेच, बिग बॉसच्या घरात निक्कीने खूप चांगल्या पद्धतीने गेम खेळली.

कधी रागीट तर कधी गोड स्वभावाच्या निक्कीने प्रेक्षकांच्या मनात आपली एक खास ओळख निर्माण केली. यामुळेच ती शोमध्ये एवढ्या लांब येण्यात यशस्वी झाली. फिनालेच्या वेळेस निक्कीने 14 लाख घेऊन शो सोडण्याची इच्छा जाहीर केली होती. परंतु, राखी सावंतने तिच्या अगोदर बझर दाबून ती रक्कम घेऊन बाहेर पडली.

निक्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने ‘कंचना 3’ आणि ‘थिप्परा मिसम’ यांसारख्या दक्षिण चित्रपटामध्ये काम केले आहे.

राहुल वैद्यही या सीजनमध्ये एक प्रबळ स्पर्धक म्हणून सिद्ध झाला. तो टॉप 3 मध्ये पोहचण्यास यशस्वी ठरला. एवढेच नव्हे तर तो शोचा उपविजेताही बनला. राहुलने त्याच्या माईंड गेमने प्रेक्षकांना चकित केले.

शोच्या माध्यमातून राहुलला गायकाव्यतिरिक्त एक नवी ओळख मिळाली. तसेच, सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचे बरेच कौतुक केले.

फिनालेच्या वेळी जेव्हा राहुलला विचारले गेले की त्याला कोणत्या गोष्टीचा खेद आहे. तेव्हा तो म्हणाला, “जान कुमार सानूला घराणेशाहीबद्दल बोललो यासाठी मला वाईट वाटते. जानचे आईवडील खूप वर्षांपूर्वीच वेगळे झालेत, हे मला माहित नव्हते”. तसेच, राहुल वैद्यने शोमध्ये दिशा परमारला प्रपोज करून बऱ्याच चर्चा रंगवल्या. ते दोघेही आता त्यांच्या लग्नाची तयारी करीत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.