चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला आता चित्रपटांमध्ये दिसत नसली, तरीही सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असते. आजकाल ती आपल्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवत आहे. जुहीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

जुही चावलाच्या या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, ती टेबलावर बसली आहे, आणि कोणाशीतरी चर्चा करताना दिसत आहे. तसेच त्यांच्या मागे आंब्याचे झाड असून, त्याला भरपूर कैऱ्या लागल्या आहेत. यावेळी जुही या फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे. या फोटोमध्ये जुहीचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे, आणि तिचा हसरा चेहरा पाहून चाहते तिला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

फोटोसह जुहीने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले, “वाडा फार्ममधील माझे नवीन कार्यालय. संपूर्ण वातानुकूलित, आणि ऑक्सिजनने भरलेले आहे. तसेच नवीन गोशाळा, कर्मचारी व्यवस्था, आणि अधिक फळझाडे लावण्याचे नियोजन आहे.”

जुही सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देते, आणि वुमन ऑफ इंडिया ऑर्गेनिक महोत्सवाच्या मुंबई आवृत्तीची ब्रँड एंबेसेडर देखील आहे. एका मुलाखती दरम्यान जुहीने सांगितले की, ‘माझ्या शेतकरी वडिलांनी वाड्यात २० एकर जमीन खरेदी केली होती. जेव्हा त्यांनी शेतीत लागवड केली होती, तेव्हा मी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त होते, आणि त्याकडे लक्ष देण्यासही माझ्याकडे वेळ नव्हता. त्यांच्या निधनानंतर मी याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.’

जुही चावलाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात १९८६  मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटापासून केली होती. त्यानंतर ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. १९८४ मध्ये जुही चावलाने, मिस इंडियाचे विजेतेपदही जिंकले होते. १९९७ मध्ये जय मेहतांशी लग्न केल्यानंतर जुहीने चित्रपटांमधून ब्रेक घेतला, आणि कौटुंबिक जीवनात व्यस्त झाली. जुहीला जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. या व्यतिरिक्त जुही शेवटी २०१ ७ मध्ये ‘द टेस्ट केस’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग


Leave A Reply

Your email address will not be published.