खटके कुणामध्ये उडत नसतात? अर्थातच लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांनाच कधी ना कधी समोरच्या व्यक्तीबद्दल खटकत असतं. मग म्हणून ते काय वर्षोनुवर्षे एकमेकांसोबत बोलतच नाहीत, असं तर होत नाही ना, पण मंडळी सिनेसृष्टीतील एक कलाकार जोडी अशी आहे, ज्यांच्यात छोट्याश्या कारणामुळे बिनसलं आणि त्यांनी एक-दोन वर्षे नाही, तर तब्बल 7 वर्षे एकमेकांशी चर्चा केली नाही. आता तुम्ही म्हणाल कोण होती बरं ती कलाकार जोडी, तर ती जोडी होती आमिर खान आणि जुही चावला. आमिरनं असं काय केलं होतं की, ज्यामुळं जुही त्याच्यासोबत थेट 7 वर्षे बोलली नव्हती. हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
तर हे घडलं होतं 1997 सालच्या ‘इश्क’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान. सिनेमात होते आमिर खान(aamir khan), जुही चावला (juhi chawlas), अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (kajol). सिनेमाच्या सेटवर आमिर आणि अजयची तीच आपली मजा-मस्ती सुरू होती. ते सेटवर प्रँकही करायचे. त्यावेळी अभिनेते दलीप ताहिल यांच्यासोबत सिनेमाच्या एका सीनची शूटिंगही सुरू होती, त्यावेळी आमिर- अजयने सेटवर असलेल्या एका व्यक्तीला रिक्वेस्ट करून कसली तरी पावडर मागवली. जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा आमिरने दलीप यांना आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवलेलं. पावडर येताच अजयने हळूच ते पॅकेट आमिरच्या हातात ठेवून दिलं. आमिर आपलं बोलणं संपवून दलीप यांच्या मागे गेला आणि हळूच ते पॅकेट उघडून पावडर दलीप यांच्या कपड्यांमध्ये टाकली. दलीप अचानक गोंधळात पडले. अरे हे काय होतंय. त्यांना वाटलं खूप सारे मच्छर चावतायत, पण तेवढ्यात सेटवर असलेले सर्वजण खदाखदा हसू लागले. जी पावडर अजयने आमिरकडे दिली होती, ती खाज सुटणारी पावडर होती. ‘इश्क’ सिनेमाच्या सेटवर अशाप्रकारच्या गोष्टी होणं सामान्य होतं.
एके दिवशी ‘अंखिया तू मिला ले राजा’ या गाण्याची शूटिंग सुरू होती, पण आमिर आणि अजयचे प्रँक्स काय थांबायचं नावंच घेत नव्हते. आमिर आणि जुहीने ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारून एकत्रच करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी पुढे 5 सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. ‘इश्क’ हा त्यांचा सातवा सिनेमा होता. दोघांमध्ये एकमेकांसोबत कम्फर्ट होते. अशातच आमिरने पुडी सोडली की, त्याला ज्योतिष विद्या येते. तो हात पाहूनच लोकांचं भविष्य सांगू शकतो. जुहीपण आमिरच्या जाळ्यात अडकली. तिला वाटलं आमिरला खरंच ज्योतिष विद्या येते आणि तो माझ्या भविष्याबद्दल नक्कीच काहीतरी चांगलं सांगेल, पण कशाचं काय, जसा जुहीनं हात पुढं केला, तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. मग काय आमिरसोबत रोमँटिक सिनेमे देणारी जुही या एका गोष्टीमुळं भलतीच नाराज झाली. जोरजोरात रडू लागली. धमकी देणाऱ्या सुरात ती म्हणाली, “मी उद्या शूटिंग करण्यासाठी सेटवर येणार नाही.”
सर्वांना वाटलं आता जुहीचा पारा चढला आहे, त्यामुळं ती असं बोलत आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाची सगळी कास्ट आणि क्रू सेटवर आले, पण जुहीचा पत्ताच नव्हता, तेव्हा कुठं सिनेमाचे दिग्दर्शक इंदर कुमार यांना प्रकरणाची गंभीरता लक्षात आली. त्यांनी आमिर आणि अजयला घेऊन थेट जुहीचं घर गाठलं दोघांनीही जुहीची माफी मागितली आणि तेव्हा कुठं वातावरण शांत होण्याचा वाटेवर होतं, पण या घटनेनंतर जेव्हा जुही पहिल्यांदा सेटवर आली, तेव्हा आमिरने तिच्यावर आगपाखड केली.
त्याने रागारागात तिला समजावून सांगितलं की, सेटवर न येण्याचा तिचा निर्णय खूपच मूर्खपणाचा होता. सगळी तयारी झाली होती, पण तिच्या न येण्याने शूटिंग झाली नाही, ज्यामुळे निर्मात्याचाही एका दिवसाचा पैसा पाण्यात गेला. जुहीला आमिरचं म्हणणं पटलं होतं बरं का, पण आता चूक तर झाली होती.
यानंतर आमिर आणि जुहीमध्ये चर्चा होणं बंद झालं होतं, जिथे जुही जायची, तिथून आमिर 50 फूट लांबून चालायचा. त्यांच्यातील हाय हॅलो, गुडनाईट बिडनाईट सगळं बंद झालं होतं. दोघांनीही फक्त शूटिंगच्याच वेळी कॅमेऱ्यावर एकमेकांशी चर्चा केली. या घटनेनंतर जुही आणि आमिरने पुढच्या 7 वर्षांपर्यंत एकमेकांशी चर्चा केली नव्हती.
तर हे होतं आमिर आणि जुहीचं 7 वर्षे न बोलण्यामागील कारण. आमिर खान आणि जुही चावला यांनी एकत्र काम केलेला हा शेवटचा सिनेमा होता. तसेच, काजोलच्या भूमिकेसाठी करिश्मा कपूरला अप्रोच करण्यात आलं होतं, पण अजय देवगणसोबत काम करण्याची इच्छा नसल्यानं तिनं ते नाकारलं. (aamir khan spitting in juhi chawlas hand)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याला गर्विष्ठ म्हणाला, त्याच ‘भाईजान’ने वाचवले आमिरचे प्राण; दीड वर्षे घेतलेलं स्वत:ला घरात कोंडून
रीना दत्ताशी केले होते आमिर खानने पहिले लग्न; तर बोलणं झालं नाही म्हणून रडला होता अभिनेता