Wednesday, February 21, 2024

जुही चावलामुळे ‘ही’ अभिनेत्री बनली सुपरस्टार, आजही ‘त्या’ चित्रपटांना दिलेल्या नकाराचा होतो पश्चाताप

अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. यातच नाव येते, ते अभिनेत्री जुही चावलाचे (Juhi Chawla). हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता, जेव्हा जुही चावलासारख्या अभिनेत्रींचा बोलबाला होता. जुहीची लोकप्रियता इतकी अफाट होती की, प्रत्येक दिग्दर्शकाला तिच्यासोबत चित्रपट बनवण्याची इच्छा होती. अशातच जुहीला तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकाराव्या लागल्या होत्या. यात काही चांगले चित्रपटही होते, ज्यात काम करून इतर अभिनेत्रींचे नशीब चमकले.

एका मुलाखतीत जुहीने खुलासा केला होता की, तिला ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’ आणि ‘बीवी नंबर 1’ सारखे चित्रपट नाकारल्याचा पश्चात्ताप आहे. पण तिच्या नकारामुळे इतर अभिनेत्री सुपरस्टार बनल्या, याचा तिला आनंदही आहे. जुहीने या चित्रपटांना नकार दिल्याचा सर्वात जास्त फायदा करिश्मा कपूरला (Karisma Kapoor) झाला, जिने या तिन्ही चित्रपटांमध्ये काम केले. करिश्माला ‘राजा हिंदुस्तानी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर ‘दिल तो पागल है’साठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दरम्यान जुहीने एका मुलाखतीत सांगितले की, तिला हे चित्रपट सोडल्याचा पश्चाताप होतो. (juhi chawla regrets that she said no to raja hindustani which made karisma kapoor career)

 

दिलेल्या मुलाखतीत जुही म्हणाली, “मला अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, पण माझा अहंकार आड आला. मी असे काही चित्रपट करायला हवे होते, जे मी केले नाहीत. मी अधिक मेहनत करायला हवी होती आणि स्पर्धात्मक असायला हवे होते. मी सोपा मार्ग स्वीकारला आणि मी जे करायते तेच करत राहिले. मला सोयीस्कर असलेल्या लोकांसोबतच मी काम केले. मी माझ्या सीमाही मोडल्या नाहीत.”

जुहीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्रीने ‘कयामत से कयामत तक’, ‘येस बॉस’, ‘हम है राही प्यार के’, ‘इश्क’, ‘डुप्लिकेट’ यांसारख्या बऱ्याच हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. (juhi chawla regrets that she said no to raja hindustani which made karisma kapoor career)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

‘डर’साठी जुही चावला नव्हती पहिली पसंती, ‘या’ सुंदर अभिनेत्रीला काढून टाकण्यासाठी आमीरने केली होती युक्ती!

हे देखील वाचा