Wednesday, March 18, 2026
Home बॉलीवूड जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान

जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान

बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार त्यांची मैत्री अतिशय प्रामाणिक पद्धतीने निभावतात. अनेक कलाकार त्यांच्या मित्रांसोबत अनेक व्यवसाय देखील करतात. याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. इंडस्ट्रीमधील पक्की यारी दोस्तीवाली एक जोडी म्हणजे, जुही चावला आणि शाहरुख खान. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. याशिवाय ते खऱ्या आयुष्यात खूपच चांगले मित्र आहेत. अनेकदा त्यांची मैत्री किती पक्की आहे हे सिद्ध झाले आहे. आर्यन खानला अं’मली पदार्थांच्या केसमध्ये जुहीने जमीन मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. जुही आणि शाहरुख यांनी मिळवून आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स नावाची टीम देखील विकत घेतली आहे. त्यांच्या टीमच्या सामन्यांदरम्यान जुही आणि शाहरुख नेहमीच त्यांच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असतात.

काही दिवसांपूर्वी जुही एका शोमध्ये आली होती. या शोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये जुहीने अनेक मजेदार खुलासे केले आहेत. यातलाच एक खुलासा म्हणजे, जेव्हा त्यांच्या टीमचा सामना चालू असतो, तेव्हा जुही खूपच अंधविश्वासू होते, तेव्हा तिला शाहरुख खूपच ओरडतो.

जुही चावल्याने सांगितले की, जेव्हा ती शाहरुख खानसोबत आयपीएल सामान्यांना जाते तेव्हा ती लगेचच देवाचे समरण करायला सुरुवात करते. ती वेगवेगळे मंत्र म्हणते, सर्वांचा नमस्कार करते. हनुमानाला नमस्कार करते. जोरजोरात गायत्री मंत्राचा जप देखील करते. सर्वच ती त्यावेळेत करत असते.

एकीकडे जुही टीमच्या परफॉर्मन्समुळे टेन्शन तर दुसरीकडे शाहरुख ओरडत असतो. तो बोलतो, “कशी बॉलिंग करतोय, फिल्डिंगच्या तुलनेत बॉलिंग खराब आहे. हे चांगले नाही, मला एक टीम मिटिंग बोलवावीच लागेल. जेव्हा केकेआर कोणता सामना हारतात तेव्हा शाहरुख टीमची मिटिंग बोलावतो. सर्वाना वाटते की हा आता ओरडेल, मात्र तो येतो आणि इकडच्या तिकडच्या गप्पा, किस्से, दुसऱ्या सामन्यांबद्दल खेळाडूंबद्दल बोलतो आणि शेवट म्हणतो की, चांगले खेळा मिटिंग संपली.”

जुही आणि शाहरुखच्या कुटुंबाचे देखील खूप चांगले संबंध आहे. आयपीएलच्या एका लिलावामध्ये देखील आर्यन आणि जुहीच्या मुलीला एकत्र पाहिले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा