ज्युनिअर एनटीआरने पुनीत राजकुमारसाठी गायले गाणे, ऐकून चाहतेही झाले भावुक


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पावरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) याच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. त्याने त्याच्या जबरदस्त अभिनयाने सगळ्यांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. नुकतेच बंगळुरूमध्ये एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाच्या एका इव्हेंटवेळी ज्युनिअर एनटीआरने दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ज्युनियर एनटीआर पुनीत राजकुमारचा चित्रपट ‘चक्रव्यूह’चे ‘गेलेया गेलेया’ हे गाणे गात म्हणाला की, “ही माझी पहिली आणि शेवटची वेळ आहे जे मी आता हे गाणे गात आहे.” त्याने शेवटी गाणे गाताना सांगितले की, “ते जिथेही असतील त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असेल.”

यावेळी ज्युनिअर एनटीआरसोबत राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण हे कलाकार उपस्थित होते. (Junior NTR make everyone emotional as he sings Puneeth rajk7nar gelaya gelaya sing and pay tribute to him)

यावेळी वातावरण भावनिक झाले होते, तरी देखील थोडी फार मजा मस्ती झाली. अजय देवगणने ज्युनिअर एनटीआरला ‘आता माझी सटकली’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स देखील शिकवल्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तसेच अनेकांना हा व्हिडिओ आवडत आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन आणि ड्रामा दिसत आहे. सगळ्या कलाकारांनी यात अतिशय सुंदर अभिनय केला आहे. आलिया या चित्रपटात वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. एसएस राजामौली यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट, राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि ओलीविया मॉरिस हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

अधिक वाचा –

 

पुनीत राजकुमार यांचा जन्म २९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला. त्याच्या अंतिम दर्शनासाठी अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच त्यांचे १० लाख चाहते देखील उपस्थित होते.


Latest Post

error: Content is protected !!