‘गुंड भाईला अभिनयाचा अ पण येत नाही’, सलमान खानवर पुन्हा एकदा केआरकेचा निशाणा


‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर स्वयंघोषित फिल्म क्रिटिक केआरके आणि सलमान खान यांच्यात सुरू झालेला वाद काही शमण्याचे नाव घेत नाही. राधेच्या प्रदर्शनानंतर केआरकेने सिनेमाचा रिव्ह्यू करताना सलमान खानबद्दल अपमानजनक शब्द आणि त्यानंतर आरोप केले होते. या आरोपांविरोध सलमान आणि त्याच्या टीमने केआरकेवर मानहानीचा खटला दाखल केला. मात्र, हे सर्व घडल्यानंतरही केआरके काही शांत बसत नाहीये.

सलमान खानने मुंबई कोर्टात केआरकेच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्यामुळे कारवाईची मागणी केली. कोर्टातून कायदेशीर नोटीस मिळाली. सोबतच त्याला मानहानी करणाऱ्या कोणत्याही कमेंट्स न करण्यासाठी देखील सांगण्यात आले होते. यानंतर केआरकेने देखील इथून पुढे सलमान खानच्या चित्रपटांचे परीक्षण न करण्याचे घोषित केले होते. मात्र, असे असूनही केआरकेने पुन्हा सलमान खानवर कमेंट केली आहे.

केआरकेने त्याच्या ट्विटरवर लिहिले आहे की, “बॉलिवूडचा गुंड असणाऱ्या भाईचे दुःख माझ्याकडून बघवले जात नाही. माझ्यासारख्या एकट्या क्रिटिकने या बिचाऱ्याचे संपूर्ण करिअर संपवले आहे. पण करिअर होतेच कुठे? त्याला तर अभिनयाचा अ पण येत नाही. जबरदस्तीचा स्टार होता. फक्त मला लोकांना हे सांगायला जरा उशीर झाला. सत्यमेव जयते.”

यानंतर त्याने पुन्हा दुसरे ट्विट करत लिहिले की, “एक मोठा माणूस तोपर्यंत गिडगिडत नाही, जोपर्यंत त्याचे १०० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान होत नाही. आता या बिचाऱ्याचे देखील एवढे नुकसान झाले आहे.”

सलमानने केआरकेवर त्याचा व्यवसाय, चित्रपट, NGO आदींवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट्स किंवा व्हिडिओ टाकण्यावर निर्बंध आणले होते. या केसच्या सुनावणी दरम्यान केआरकेचे वकील मनोज गडकरी यांनी देखील केआरके पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कमेंट करणार नाही, असे सांगितले होते. केआरकेने सलमानच्या वयावरही टिपण्णी केली होती.

आता केआरकेच्या या कमेंटवर सलमान खान काय उत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवाय त्याने त्याच्यावरील निर्बंध देखील तोडल्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय घेते, हे सुद्धा पाहण महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.