Monday, June 24, 2024

‘राधे’ चित्रपटावरून अभिनेत्री सोफिया हयातचा सलमान खानवर ‘हल्ला बोल’; म्हणाली, ‘आपल्यापेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत…’

सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अनेकांनी या चित्रपटाविषयी त्यांचे मत व्यक्त केले आहे. अशातच अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात हिने देखील सलमान खानच्या या चित्रपटावर हल्ला बोल केला आहे.

ती म्हणाली की, सलमान खानने असा एक चित्रपट बनवला आहे ज्यामुळे लोकांना कंटाळा आला आहे. यासोबतच तिने सलमानला प्रश्न विचारला आहे की, तो त्याच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत काम का करत नाही? तिने रणदीप हुड्डाचे खूप कौतुक केले. मात्र, ती म्हणाली की, सलमान खानसोबत काम करण्यासाठी त्याने अशा चित्रपटात काम केले.

सोफिया हयातने इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, “सलमान खान हा त्याचा चित्रपट प्रदर्शित होताना प्रत्येक वेळेस तिची ट्रिक वापरतो. तो त्याचे सगळे चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करतो. धार्मिक सणांना वैयक्तिक दिवस म्हणून साजरा करतो. प्रत्येक वेळेस तो त्याची कहाणी सर्वांसमोर घेऊन येतो. दर वेळी प्रमाणे एक मुलगी एका मुलाला भेटते. प्रत्येक वेळेस तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेत्रीसोबत काम करतो. त्याने एक काम काय केले, तर त्याने समंजसपणा सोडूनच दिलाय. पण त्याला पाहणारे प्रेक्षक आता समजदार झाले आहेत. त्यांना आता समजले आहे तो नक्की काय करतो. राधे चित्रपटाचा ट्रेलर बघताच मला समजले होते की, मी तो पूर्ण पाहू शकणार नाही.”

सोफियाने पुढे लिहिले की, “रणदीप हुड्डाला पाहून मला खूप वाईट वाटले. तो एक चांगला अभिनेता आहे पण या खराब रोलसाठी त्याचा अभिनय गेला. त्याने हा अभिनय त्यासाठी केला आहे का? जेणेकरून त्याला सलमान खान सोबत काम करण्याची संधी मिळाली. इंडस्ट्रीमधील हाच दोष आहे. प्रतिष्ठेसाठी लोकं पात्र निभावतात. कल्पना करा जर रणदीप हुड्डाने असे म्हटले असते, ‘चरित्र चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे आणि फालतू आहे,’ तर तो कदाचित बॉलिवूडमधून बाहेर फेकला गेला असता. मी स्वतः बिग बॉसमध्ये सलमान खानजवळ मंचावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. कारण माझी नैतिकता वास्तव आणि अहंकारापेक्षा जास्त मजबूत आहे. भारतातील लोक मूर्ख नाहीयेत. ते आता हुशार होत चालले आहे. हे आता सलमान खानला समजले पाहिजे.”

सोफिया हयातच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सिक्स एक्स’, ‘डेअरी ऑफ बटरफ्लाय’, ‘द अनफर्गटेबल’ ‘अक्सर 2’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. या सोबतच बिग बॉसची देखील स्पर्धक होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा