‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ सिनेमाला १९ वर्षे पूर्ण; फोटो शेअर करत अजय म्हणतो, ‘एकदा भूमिका साकारणे पुरेसे…’


बॉलिवूडमध्ये दरवर्षाला जवळपास १२०० पेक्षा अधिक सिनेमे तयार होतात. मात्र, या सर्व सिनेमांमध्ये मोजकेच सिनेमे असे असतात, जे प्रेक्षकांच्या डोक्यासोबतच मनावर देखील छाप सोडतात. अशा सिनेमांच्या कथा, कलाकार, अभिनय सर्वच गोष्टी कायमस्वरूपी मनावर कोरल्या जातात. असे सिनेमे किंवा विशिष्ट भूमिका आपल्याला आपल्या करिअरमध्ये एकदा तरी साकारता याव्या, यासाठी प्रत्येक कलाकार प्रतीक्षेत असतो. ड्रीम भूमिका म्हणून प्रत्येक कलाकाराच्या डोक्यात काही नाव पक्के असतात. अशीच एक भूमिका म्हणजे थोर क्रांतिकारक भगतसिंग यांची.

अजय देवगण अभिनित ‘द लिजंड ऑफ भगतसिंग’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन नुकतेच १९ वर्ष पूर्ण झाले. ७ जून, २००२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. या चित्रपटात अजयने भगतसिंह ही मुख्य भूमिका साकारली होती. या निमित्ताने अजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहेत.

अजयने त्याच्या पोस्टमध्ये भगतसिंगच्या रूपातील एक फोटो पोस्ट करत लिहिले की, “आपल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये एकदा भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकाची भूमिका साकारणे पुरेसे नाहीये. आपल्याला त्यांना कायमस्वरूपी राहू देण्याची आवश्यकता आहे. शेवटी हे तेच आहेत, ज्यांनी त्यांच्या रक्ताने इतिहास लिहिला आहे.”

सोबतच त्याने 19इयर्सऑफदलिजंडऑफभगतसिंह आणि राजकुमारसंतोषी हा हॅशटॅग वापरला आहे. अजयची ही पोस्ट व्हायरल झाली असून, त्यावर फॅन्सकडून भरपूर कमेंट्स येत आहेत.

या सिनेमातील भूमिकेसाठी अजयला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राजकुमार संतोषी यांच्या या सिनेमाला हिंदीमधील सर्वश्रेष्ठ फिचर सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच या सिनेमात सुशांत सिंग सुखदेव, डी. संतोष राजगुरु, अखिलेंद्र मिश्रा चंद्रशेखर आजाद यांच्या भूमिकेत झळकले होते. सोबतच राज बब्बर आणि अमृता राव देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसले होते.

अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर तो ‘मैदान’, ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’, ‘आरआरआर’, ‘मेयडे’ यांसारख्या सिनेमात दिसणार असून सूर्यवंशी आणि गंगूबाई काठियावाडीमध्ये तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.