Saturday, June 22, 2024

पतीच्या निधनानंतर केवळ 24 दिवसातच के विश्वनाथ यांच्या पत्नी जयलक्ष्मी यांचे निधन

तेलुगू चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हणजेच के विश्वनाथ यांचे याच महिन्यात 2 तारखेला दुःखद निधन झाले. आता त्यांच्या जाण्याच्या केवळ 26 दिवसानंतर लगेचच त्यांची पत्नी असणाऱ्या काशीनाथुनी जयलक्ष्मी यांचे देखील दुःखद निधन झाले आहे. 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान त्यांनी हैद्राबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 2 फेब्रुवारी रोजी निधन झाले. केवळ एक महिन्याच्या आतच जयलक्ष्मी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हे दोघेही हैद्राबाद येथेच वास्तव्यास होते.

सांगितले जाते की, काशीनाथुनी जयलक्ष्मी कुरनूल जिल्ह्याच्या रहिवासी होत्या. त्यांचे वडील स्टेशन मास्टर होते. त्यांना रवींद्रनाथ विश्वनाथ, नागेंद्रनाथ विश्वनाथ आणि एक मुलगी पद्मावती विश्वनाथ तीन मुलं होती. यशिवाय त्यांना 6 नाती आणि नातू देखील आहेत. त्यांचे दिवंगत पती आणि दिग्दर्शक के विश्वनाथ यांना 2017 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1992 रोजी त्यांना पदमश्री हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच त्यांना फिल्मफेयर आणि काही राष्ट्रीय पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी त्यांनी श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले होते.

काही दिवसांपूर्वीच काशीनाथुनी जयलक्ष्मी यांची अभिनेते पवनकल्याण आणि चिरंजीवी यांनी त्यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली होती. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस

‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो

हे देखील वाचा