Wednesday, July 3, 2024

निळाशार समुद्र पाहून स्वतःला रोखू शकली नाही शेफाली जरीवाला, केलं ‘असं’ काही की बघतच राहिले चाहते

शेफाली जरीवालाला (Shefali Jariwala) आज कोणत्याची परिचयाची गरज नाही. ‘कांटा लगा’ या गाण्याने तिने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. रुपेरी पडद्यावर ती क्वचितच दिसली असली, तरी ती तिच्या सौंदर्याने सोशल मीडियावर चर्चा रंगवत असते. अशातच आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे.

समुद्रात केली मजा!
व्हिडिओमध्ये शेफाली जरीवालाने बिकिनी घातलेली दिसत आहे. तिने सनग्लासेसही घातलेला आहे. समुद्रात उतरल्यानंतर ती खूप आनंदी दिसत आहे आणि खूप मजा करत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘गेहराईयां’ चित्रपटातील ‘डुबे’ हे गाणे ऐकू येत आहे. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून, त्याला मोठ्या प्रमाणात लाइक आणि शेअर केले जात आहे. (kaanta laga girl shefali jariwala wears bikini and take a dip in sea)

चाहते झाले मदहोश
शेफाली जरीवालाच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तुझी प्रत्येक अदा कातिलाना आहे.” दुसर्‍याने लिहिले, “तू पाण्यात आग लावली आहे.” एकाने कमेंट केली, “सेक्सी क्वीन.” याशिवाय काही युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजींचा वर्षाव केला आहे.

शेफालीला यायचे अपस्माराचे झटके
फार पूर्वी शेफाली जरीवालाने एका वेबसाईटशी बोलताना तिच्या आयुष्यातील असे रहस्य सांगितले होते, जे कोणालाच माहित नव्हते. शेफाली म्हणाली, “मला वयाच्या १५व्या वर्षापासून अपस्माराचे झटके येऊ लागले. त्यावेळी माझ्यावर अभ्यासाचे दडपण होते. तणाव आणि चिंतेमुळे हे माझ्या बाबतीत घडले. मला वर्गात, स्टेजच्या मागे आणि कधी कधी रस्त्यावरही झटके यायचे.”

या गंभीर आजाराविषयी बोलताना शेफाली जरीवाला म्हणाली की, “काटा लगानंतर मी बराच काळ काम केले नाही. कारण पुढचा झटका कधी येईल, हे मला माहीत नव्हते. हे माझ्यासोबत १५ वर्षे चालले.” शेफाली जरीवाला ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसली आहे. वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून त्याने शोमध्ये प्रवेश केला होता. शोमध्ये शेफालीच्या गेम प्लॅनचे आणि तिच्या ड्रेसिंग सेन्सचे खूप कौतुक झाले. मात्र, काही दिवसांनी ती बेघर झाली.

हेही वाचा :

हे देखील वाचा