Wednesday, March 22, 2023

कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS व्हिडिओ लीक? व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा

आजच्या काळात सोशल मीडिया एक असे माध्यम बनले आहे, जिथून लोक रातोरात स्टार बनतात. याच्या मदतीने अनेकांचे आयुष्य बदलले आहे, तर अनेक लोक करोडपती झाले आहेत. यामध्ये अंजली अरोराचे (Anjali Arora) नाव आहे, जी रील बनवून लोकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. तिची फॅन फॉलोइंग कोटींच्या घरात आहे. अंजलीचे व्हिडिओ आणि फोटो लोकांना खूप आवडतात. पण, सध्या ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. वास्तविक, अंजली अरोराचा एमएमएस व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा केला जात आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. महत्वाचे म्हणजे या प्रकरणावरून सोशल मीडियावरही वातावरण तापले आहे.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक एमएमएस व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही किंवा अंजलीच्या बाजूने व्हिडिओबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर लोक या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये काही लोक अंजलीला ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर काही युजर्स आश्चर्यही व्यक्त करत आहेत. अंजली अरोराची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे, असेही मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. तर काही लोक व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा असल्याचेही म्हणत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

दरम्यान, अंजली अरोरा ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर डान्स करुन रातोरात स्टार झाली होती. तिच्या या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अंजली कंगणा रणौतच्या लॉकअपमध्येही झळकली होती. या कार्यक्रमातही तिने तिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा –

बापरे! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मोडला पाय, शुटिंगदरम्यान झाला अपघात

बाथटबमध्ये बसून दिल्या हटके पोझ, अंकिता लोखंडेच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा

कोण आहे फरमानी नाज? ‘हर घर तिरंगा’ गाण्याने होतेय सर्वत्र चर्चा

हे देखील वाचा