Monday, February 24, 2025
Home कॅलेंडर नाद…नाद…नादच! ‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे भुबन झाला लखपती; दिल्ली- मुंबई सोडाच, थेट बांगलादेशातून येतायत ऑफर्स

नाद…नाद…नादच! ‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे भुबन झाला लखपती; दिल्ली- मुंबई सोडाच, थेट बांगलादेशातून येतायत ऑफर्स

इंटरनेटच्या जगात तो कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या ‘कच्चा बदाम’ गाण्याची जादू सर्वांवर पसरली आहे. शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीचे हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, सर्वांनी त्यावर रील्स आणि डान्सचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. ‘कच्चा बदाम’ हे गाणे आता फक्त भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध झालं आहे. हे गाणेच प्रसिद्ध झालंय म्हणल्यावर या गाण्याचा गायकही प्रसिद्ध होणार हे मात्र नक्कीच. हे गाणे गाणाऱ्या गायकाचं नाव आहे भुबन बदायकर. भुवनला आता सगळीकडे ओळखले जात आहे. आता त्याच्या गाण्यासाठी त्याला लाखो रुपये मिळाले आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या पोलिसांनीही त्याला सन्मानितही केले आहे. यासोबतच भुबनला दिल्ली, मुंबई आणि चक्क बांगलादेशातून खूप साऱ्या ऑफर्सही येत आहेत.

खरं तर, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, भुबनने आपले दुःख व्यक्त केले आणि सांगितले की त्याने एका म्युझिक स्टुडिओमध्ये एक गाणे शूट केले होते आणि त्याचा ऑडिओ-व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता, परंतु त्याला त्याचे पैसे मिळाले नाहीत. हे ऐकून त्याच्या चाहत्यांनी त्याच्या हक्काची मागणी करायला सुरुवात केली. आता याच म्युझिक स्टुडिओने भुबनला लाखो रुपये दिले आहेत. या कंपनीने भुबनसोबत ‘कच्छा बदाम’ गाण्याचे रिमिक्स व्हर्जन रेकॉर्ड केले होते.

भुबनला बनवायचंय जास्तीत जास्त व्हायरल होणारे गाणे
भुबनला गुरुवारी (१७ फेब्रुवारी) गोधुली बेला म्युझिकने ३ लाख रुपये दिले आहेत. तसेच त्याच्यासोबत एक कॉन्ट्रॅक्टही साईन केले आहे. रुपये मिळाल्यानंतर भुबन खूपच आनंदी झाला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, “लोक आता माझ्या गाण्यांवर नाचत आहेत, त्यामुळे तुम्हाला समजेल की, मी सेलिब्रिटी झालो आहे. यापुढे मला शेंगदाणे विकावे लागणार नाहीत. आता मी शेंगदाणे विकण्याचा प्रयत्न केला, तरीही माझ्याकडून कोणी खरेदी करणार नाही. त्यापेक्षा सर्वजण मला गाणे गाण्याची विनंती करतील. माझे गाणे मला लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकत असेल, तर मी संगीतावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. आता मला जास्तीत जास्त गाणी व्हायरल करायची आहेत.”

बांगलादेशातून येतायत भुबनला ऑफर
भुबन पुढे बोलताना म्हणाला की, “पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मला माहित आहे की, मी काय मिळवू शकतो. लोक आजवर माझ्या गाण्यांचा वापर त्यांच्या लोकप्रियतेसाठी करत होते आणि त्यामुळे मला काहीही त्रास होत नव्हता. आता मला आशा आहे की, सर्व काही बदलेल. मला मुंबई आणि दिल्लीतून ऑफर येत आहेत. तसेच मला बांगलादेशातूनही ऑफर येत आहेत, पण माझ्या पत्नीला मी तिथे जावे असे वाटत नाही. असे असले, तरीही मला आनंद आहे की, माझ्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ मिळत आहे.”

म्युझिक कंपनीने भुबनसोबत केला ३ लाख रुपयांचा करार
गोधुली बेला म्युझिकच्या गोपाल घोष यांनी भुबनबद्दल बोलताना सांगितलं की, “आम्ही भुबन दासोबत ३ लाख रुपयांचा करार केला आहे. आम्ही त्याला १.५ लाख रुपये आधीच दिले आहेत. बाकीचे रुपये आम्ही पुढील आठवड्यात देणार आहोत.”

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

यासोबतच भुबनला त्याच्या कलागुणांसाठी पश्चिम बंगाल पोलिसांनीही गौरविले आहे. भुबनचे पोलिसांसोबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. भुबन हा पश्चिम बंगालच्या कुरलगुरी गावात राहणारा गरीब व्यक्ती आहे. पोट भरण्यासाठी भुबन गावातील रस्त्यांवर शेंगदाणे विकायचा. भुबन सायकलवर पिशवी घेऊन रस्त्यात सामंजस्याने शेंगदाणे विकायचे. ते क्रिएटिव्ह पद्धतीने विकण्यासाठी भुबनने ‘कच्चा बदाम’ हे गाणे तयार केले होते, जे व्हायरल झाले आहे.

या गाण्यावर सामान्य लोकांसोबतच मोठमोठे कलाकारही रील्स आणि व्हिडिओ तयार करत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा