×

कोणत्याही प्रसिद्ध गायकाने नाही, तर शेंगदाणा विक्रेत्याने गायले ‘कच्चा बदाम’ गाणे, परदेशीही झाले वेडे, पाहा VIDEO

सध्याच्या युगात सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. सोशल मीडियाच्या जमान्यात रोज काही ना काही व्हायरल होत आहे. आजकाल प्रत्येकाला ‘पुष्पा’चा फिव्हर चढला आहे. पाहा तर मग कोण अल्लू अर्जुनची कॉपी करून त्यावर रील बनवत आहेत. ‘श्रीवल्ली’ गाण्यासोबतच आता एक नवीन गाणे देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याचे बोल ‘कच्चा बदाम’ असे आहे. हे गाणे परदेशातही खूप लोकप्रिय होत आहे, पण त्याचा खरा गायक कोण आहे हे कोणालाच माहीत नाही. चला तर मग या गाण्याला आवाज देणार्‍या व्यक्तीची ओळख करून घेऊया.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शेंगदाणे विकतो ‘कच्च्या बदामा’प्रमाणे
गमतीची गोष्ट म्हणजे ‘कच्चा बदाम’ हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नसून, हे गाणे रस्त्यावर शेंगदाणे विकणाऱ्या व्यक्तीने गायले आहे. होय, तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. या गाण्याला आवाज देणाऱ्या व्यक्तीचे नाव भुबन बड्डोकर असून, तो पश्चिम बंगालचा आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोलकाता येथील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे भुबन ‘कच्च्या बदामा’चे गाणे गातो आणि ग्राहकांना शेंगदाणे खरेदी करण्यास प्रवृत्त करतो. भुबनची शेंगदाणे विकण्याची पद्धत लोकांना आवडते, त्याची स्टाईल सोशल मीडिया युजर्सची मने जिंकत आहे आणि तो देशभर प्रसिद्ध होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Mahara GDD (@shweta_mahara_gdd)

‘कच्चा बदाम’ बनले इंटरनेट सेन्सेशन गाणे
‘कच्चा बदाम’ या गाण्यावर सोशल मीडियावर सतत रील्स व्हायरल होत आहेत. कारण हे गाणे ना कुठल्या स्टारवर चित्रीत झाले आहे, ना या गाण्याचा कोणी कोरियोग्राफर आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या स्टाईलमध्ये डान्स करून व्हिडिओ शेअर बनवत आहेत. भुबनच्या गाण्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने इंटरनेटवर आपले स्थान निर्माण केले आणि शेकडो युजर्स त्यावर व्हिडिओ तयार करत आहेत. अलीकडेच भोजपुरी अभिनेत्री श्वेता महारा हिने यावर डान्स केला, ज्यामध्ये तिने केलेल्या जबरदस्त मूव्ह्जने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

View this post on Instagram

A post shared by Dasom Her (@luna_yogini_official)

दक्षिण कोरियातील एका आई-मुलीच्या जोडीनेही ‘कच्चा बदाम’वर डान्स केला आहे. या दोघींचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा-

Latest Post