×

अक्षय कुमारसोबत झळकलेला ‘हा’ अभिनेता करायचा फायनान्स कंपनीत काम, ‘चिडिया घर’मधून पोहोचला घराघरात

जेव्हाही टीव्हीवरील किंवा सिनेमातील विनोदी कलाकारांचा उल्लेख होतो, तेव्हा चाहत्यांच्या मनात फक्त कपिल शर्मा आणि भारती सिंग यांचंच नाव येतं. मात्र, कपिल आणि भारती यांच्यापूर्वी टीव्ही जगतात इतर अनेक दिग्गज विनोदी कलाकारांचे राज्य होते. या विनोदवीरांना पाहण्यासाठी रसिकांमध्ये स्पर्धा असायची. काळाच्या ओघात या विनोदवीरांची चमक कमी होत गेली ही वेगळी गोष्ट आहे. हळूहळू चाहतेही या विनोदवीरांची नावे विसरले. या विनोदवीरांपैकीच एक म्हणजे परेश गणात्रा. परेश शनिवारी (१९ फेब्रुवारी) ५७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी…

परेश गणात्रा फायनान्स कंपनीत करायचे नोकरी
परेश (Paresh Ganatra) यांचा जन्म १९ फेब्रुवारी, १९६५ रोजी मुंबईत झाला होता. परेश गणात्रा यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील लायन्स जुहू हायस्कूलमधून केले होते. त्यानंतर नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि जेके सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च मुंबई येथून शिक्षण पूर्ण केले. परेश यांना मेहमूद, जॉनी लीव्हर आणि चार्ली चॅप्लिन यांसारखे प्रसिद्ध विनोदी कलाकार खूप आवडतात. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी परेश १९९८ ते २००६ पर्यंत आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड कंपनीत नोकरी करत होते. काम करत असतानाच सिनेमातही हात आजमावत होते. त्यांनी २०१० मध्ये ‘कॉमेडी सर्कस महासंग्राम’ या कॉमेडी शोद्वारे कॉमेडीच्या दुनियेत पदार्पण केले होते.

परेश यांनी ‘चिडिया घर’ या मालिकेत घोटक नारायण नावाची व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या मालिकेमुळे ते घराघरात लोकप्रिय झाले.

आमिर खानच्या ‘मन’मधून ठेवले सिनेमात पाऊल
परेश गणात्रा यांना ‘एक महल हो सपनो का’ यासारख्या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. टीव्हीसोबतच त्यांनी १९९९ साली आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला यांच्या ‘मन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याव्यतिरिक्त त्यांनी पुढे ‘नो एन्ट्री’, ‘राऊडी राठोड’ यांसारख्या सिनेमातही काम केले. सिनेमा, टीव्ही मालिका, कॉमेडी शोमध्ये काम करून त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. कपिल शर्मा, भारती सिंगसोबत अनेक रियॅलिटी शोचा भाग असलेले हे अभिनेते अनेक जाहिरातींमध्येही दिसतात. ते टाटा फोन्स, डाबर, सिम्फनी कूलर, एलडी टीव्ही, मॅकडीजच्या प्रसिद्ध जाहिरातींमध्ये दिसले आहेत.

हेही पाहा- यूट्यूबवर राज्य करणारी भारतातील पोरं, ‘या’ यूट्यूबर्सचा नाद करायचा न्हाय 1

परेश यांनी ‘स्कॅम १९९२’मध्येगी केलंय काम
यशस्वी विनोदी अभिनेता परेश सर्वात लोकप्रिय वेबसीरिज ‘स्कॅम १९९२’ मध्येही दिसले होते. परेश यांनी हर्षद मेहता यांच्या या सीरिजमध्ये माहेश्वरीची भूमिका साकारली होती. परेश यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. परेश शो आणि मालिकांसाठी भरमसाठ फी घेतात. सध्या ते मुंबईत राहतायत आणि टीव्ही, सिनेमे, रियॅलिटी शोमध्ये काम करतात.

हेही वाचा-

Latest Post