Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड काजल अग्रवालचे झाले थाटात डोहाळजेवण पार, सोशल मीडियावर झाले फोटो व्हायरल

काजल अग्रवालचे झाले थाटात डोहाळजेवण पार, सोशल मीडियावर झाले फोटो व्हायरल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल या दिवसात तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूपच चर्चेत आहे. ती अनेकवेळा तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना फोटो शेअर करत असते. अशातच तिचे डोहाळजेवण झाले आहे. तिने तिचा पती गौतम कीचलूसोबत दिसत आहे.

काजल अग्रवालने इंस्टाग्रामवर तिचा पती गौतमसोबत फोटो शेअर करून लिहिले आहे की, “डोहाळ जेवण.” तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण त्यांना शुभेच्छा देत आहेत.

तिच्या चाहत्यांना त्याचा हा अंदाज खूप आवडला आहे. सगळेजण त्यांच्या येणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत आहेत तसेच अभिनंदन करत आहेत. त्या दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये सगळ्यांना खूप आवडते.

तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यात तिचे बेबी बंप पाहायला मिळत नाही. परंतु ती या फोटोमध्ये ती अगदी ग्लॅमरस दिसत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.

तिने बॉलिवूडमध्ये अजय देवगणसोबत ‘सिंगम’ या चित्रपटात काम केले होते. यातील तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडला होता. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये खूप भर पडली.

काजल आणि तिचा पती गौतम त्याच्या येणाऱ्या बाळाची वाट पाहत आहेत. अनेकवेळा त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा हा आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा