Saturday, September 30, 2023

‘केस विंचरायला विसरली वाटतं!’, विमानतळावर काजोलचा विचित्र लुक नेटकऱ्यांनी विचारले तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न

काजोल (Kajol) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच काजोल विमानतळावर स्पॉट झाली. त्या वेळी ती खुप गडबडीमध्ये दिसत होती. याच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याच्या मध्ये काजोलला पाहून युजर्स वेगवेगळे प्रश्न विचारत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काजोल विमानतळावर खूप वेगाने चालत आहे. तिने तिच्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे आणि एका हातामध्ये बॅग देखील आहे. त्या वेळेस एका फोटोग्राफर काजोलला म्हणतो की, “मॅम तुम्ही खूप वेगाने चालत आहात.” यावर काजोलने तिच्या गडबडीचे कारण सांगितले नाही, परंतु ती धन्यवाद बोलून पुढे निघून गेली. या दरम्यान काजोलचा लुक थोडे वेगळा दिसत होता. ज्याला घेऊन तिला ट्रोल करण्यात येत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट देखील केल्या आहेत. त्यातील एका युजर्सने लिहिले की, “जंगलातून आल्यासारखी दिसत आहे.” तर दुसरीकडे एका युजरने लिहिले की, “ही का पळत आहे.” काहीजणांनी तिच्या तोंडावर मास्क असल्यामुळे तिला ओळखले नाही. म्हणून, “ही कोण आहे?” असे काहीजण विचारत आहेत. तर नेटकरी म्हणत आहेत की, “ती घाईमध्ये केस विंचरायला विसरली वाटतं.”

काही दिवसांपूर्वी काजोल आणि अजय देवगणने त्यांचे एक घर भाड्याने दिले आहे. ते त्या घराच्या भाडेकराकडून मोठ्या रकमेत भाडे घेत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, भाडेकरूला या ७७१ स्क्वेअर फीट क्षेत्रफळात राहण्यासाठी, दरमहिन्याला ९० हजार रुपये द्यावे लागतील.

काजोलच्या कामाविषयी बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘त्रिभंगा’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर प्रेक्षकांनी खूप प्रेम दाखवले. या चित्रपटात मिथिला पालकर काजोलच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटाला समीक्षकापासून प्रेक्षकांपर्यंत खूप पसंत केले गेले.

हेही वाचा-

हे देखील वाचा