Thursday, April 18, 2024

काजोलने तिच्या क्रिप्टिक पोस्टमधून दिली ‘त्या’ लोकांना शिवी म्हणाली, “दोघांमध्ये भित्रेपणा…”

बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ९० चे दशक तुफान गाजवले. आजही ती विविध प्रवाहाच्या बाहेरील भूमिका करत तिच्यात असणाऱ्या एक उत्तम अभिनेत्री प्रेक्षकांपुढे सादर करत असते. मात्र आता नुकतेच तिने तिच्यात असणाऱ्या एका खंबीर आईचे रूप देखील प्रेक्षकांना दाखवले आहे.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या काजोलने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ती एक क्रिप्टिक पोस्ट आहे. या पोस्टवरून तिने ट्रोलर्सला चांगलाच टोला लगावला आहे. सोबतच तिच्यात असणारा सर्व राग त्यातून व्यक्त केला आहे. अंकजोलने दोन स्टोरी शेअर केल्या आहेत, त्यातल्या एका स्टोरीमध्ये तिने लिहिले, “जे लोकं आपल्या डोळ्यांनी प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘गुडबाय’ शब्द असतो. मात्र जे लोकं त्यांच्या हृदयाने आणि मनाने प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘विभक्त’ नावाची गोष्ट नसते. रुमी’”

यासोबतच तिने तिच्या दुसऱ्या स्टोरीमध्ये “#truthoftheday हा हॅशटॅग वापरत अर्थात आजच्या दिवसाचे सत्य नावाने लिहिले, “स्त्री असो किंवा पुरुष.. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भित्रेपणा असतो. (इथे तिने एक अपशब्द वापरला आहे) त्यांची किंमत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या जेंडरपुढे आंधळे होऊ नये हीच खरी युक्ती आहे.” या नंतर तिने #thishithome असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

दरम्यान नुकताच काजोलने आपल्या लेकीचा २० वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने न्यासाचे काही फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. तर काजोलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती शेवटची ‘सलाम वेंकी’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण जोहरच्या विश्वासामुळे राणी मुखर्जी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आवाजाने दिली नवी ओळख

संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार

हे देखील वाचा