Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड दुर्गा मातेच्या पूजेमध्ये सहभागी झाली अभिनेत्री काजोल, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

दुर्गा मातेच्या पूजेमध्ये सहभागी झाली अभिनेत्री काजोल, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

भारतात सणासुदीला सुरुवात झाली असून या दिवसात संपूर्ण देश माता राणीच्या रंगात रंगला आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण आपापल्या घरी देवीच्या पूजेत व्यस्त असताना दुसरीकडे दुर्गापूजा उत्सवाला जोरदार सुरुवात झाली आहे. बॉलिवूडही या उत्सवाच्या रंगात रंगून गेले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही दुर्गापूजेचा उत्साह पाहायला मिळतो. उत्सवात सहभागी होण्यासाठी ते पूजा मंडपात गर्दी करत आहेत. याचे उदाहरण म्हणजे काजोल (Kajol) जिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वर्षातून दोनदा येणा-या नवरात्रीच्या या उत्सवात बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या बॉलीवूड स्टार्समध्ये मुखर्जी कुटुंबाचे नावही सामील आहे. अयान मुखर्जीपासून राणी मुखर्जी आणि काजोलपर्यंत सर्वजण दुर्गा पूजा पंडालमध्ये डोके टेकवताना दिसत आहेत. काजोल दरवर्षी हा सुंदर उत्सव तिच्या मित्रपरिवारासह मोठ्या थाटामाटात साजरा करते. यंदाही असेच काहीसे पाहायला मिळाले.

आपली नेहमीची परंपरा कायम ठेवत बॉलीवूड अभिनेत्री काजोलने मातेचे दैवी आशीर्वाद घेण्यासाठी जुहू येथील नॉर्थ बॉम्बे सर्वजनीन दुर्गा पूजा पंडाल गाठली. काजोलसोबत तिची चुलत बहीण आणि अभिनेत्री शरबानी मुखर्जीही पंडालमध्ये दिसली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, काजोल तिच्या कुटुंबाच्या दुर्गा पूजा पंडालमध्ये दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काजोल पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तिने कानातले आणि बांगड्या घालून तिचा लूक पूर्ण केला.

माँ दुर्गेची पूजा केल्यानंतर काजोलने चाहत्यांशी संवाद साधला आणि पापाराझींसाठी पोजही दिली. दरवर्षी अभिनेत्री नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गा पूजा उत्सवात भाग घेते. पश्चिम उपनगरातील ही सर्वात मोठी पूजा आहे. ही पूजा अयान मुखर्जीचे वडील आणि काजोलचे काका देब मुखर्जी यांनी आयोजित केली आहे. आज काजोल आणि शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी काजोलने चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘गणपत’ ठरला टायगर श्रॉफच्या करिअरमधील सर्वात खराब ओपनिंग चित्रपट, पहिल्या दिवसाचे कलेक्शन वाचून बसेल धक्का
सिंदूर नसल्यामुळे शम्मी कपूर यांनी थेट भरली होती गीता बालींच्या भांगेत लिपस्टिक; खूपच रंजक आहे कहाणी

हे देखील वाचा