Tuesday, June 18, 2024

‘कल्की 2898 एडी’चे आणखी एक पोस्टर रिलीज, दीपिका पदुकोणचा अनोखा लूक समोर

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटासाठी प्रभास, अतिमभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सतत चर्चेत असतात. चित्रपटातील प्रभासचा लूक पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. यानंतर प्रभासचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांचा लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अमिताभ अश्वत्थामा अवतारात दिसले होते. आता निर्मात्यांनी दीपिका पदुकोणचा नवा लूक शेअर केला आहे, जो खूपच नेत्रदीपक आहे, ज्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सायन्स फिक्शन फिल्म ‘कल्की 2898 एडी’, जी हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहे. ‘कल्की 2898 एडी’चे निर्माते सतत या चित्रपटाविषयी काही माहिती शेअर करत आहेत. अलीकडेच या चित्रपटातील दीपिका पदुकोणचा स्टनिंग लूक शेअर करण्यात आला आहे. या लूकवर बारकाईने नजर टाकली तर दीपिका एका ठिकाणी उभी असलेली दिसत आहे जिथे तिच्या मागे अनेक मोठे पर्वत दिसत आहेत. ती पूर्णपणे ओली दिसत आहे, कारण फोटोमध्ये पाऊस पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अतिशय लहान केस असलेल्या दीपिकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना योद्ध्यासारखा भासवत आहे.

दीपिका पदुकोणने या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Hope begins with her’. दीपिकाशिवाय तिचा पती आणि अभिनेता रणबीर सिंगनेही या चित्रपटातील दीपिकाच्या लूकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरने लिहिले, ‘बूम – अमेझिंग थिंग’.

चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ या सायन्स फिक्शन चित्रपटात प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, दिशा पटानी आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैजयंती मुव्हीज निर्मित हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘कलाकारांचा त्याग कोणी पाहत नाही…’, कार्तिक आर्यनने वाढत्या खर्चाच्या चर्चेवर केले भाष्य
सोनम कपूरने 11 रुपयांत केले चित्रपटात काम, ‘भाग मिल्खा भाग’ने चमकले नशिब

हे देखील वाचा