Saturday, June 22, 2024

दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी कमल हासन यांनी जोडले होते हात, सांगितला रंजक किस्सा

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Hasan) आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिनेजगतात अनेक दशके वर्चस्व गाजवले आहे. आता लवकरच त्यांचा विक्रम  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटातून ते बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या या चित्रपटाची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे. त्याआधी त्यांनी त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त केली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

कमल हासन हे चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याआधी त्यांनी जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दलची एक खास आठवण सांगितली आहे. यामध्ये त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत चित्रपटात काम करण्याची प्रचंड इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली असे म्हणले आहे.

एका मुलाखतीत बोलताना कमल हसन यांनी सांगितले की, “मला ज्यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. आजही त्यांची मला आठवण येते, मी त्यांना काम करण्याची खूप विनंतीही केली होती पण त्यांनी अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता. ते अभिनेते म्हणजेच दिलीप कुमार. दिलीप कुमार यांच्यासोबत मला थेवर मगन हा चित्रपट करायचा होता. ज्याला प्रियदर्शन यांनी विरासत नाव देत हिंदीमध्ये प्रदर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.”

कमल हासनच्या ‘थेवर मगन’ चित्रपटात शिवाजी गणेशन, रेवती, गौतमी और नासर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. तर हिंदीमधील विरासत चित्रपटात अनिल कपूरसोबत तब्बु, पुजा बत्रा, मिलींद गुणाजी यांनी काम केले होते. हा चित्रपट १९९७ मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले होते.

हेही वाचा-
आलिया भट्टने राहाचा पहिला वाढदिवस केला खास अंदाजात साजरा, दाखवली मुलीची झलक
रियल लाईफ हिरो! ‘विक्रम’च्या जबरदस्त कमाईतून कमल हासन करणार ‘ही’ कामे, जाणून तुम्हीही कराल कौतुक

हे देखील वाचा