×

चित्रपटातील ‘अशा’ गाण्यामुळे कायदेशीर अडचणीत सापडले कमल हासन, अभिनेत्यावर गुन्हा दाखल

कमल हासन (Kamal Haasan) हे सिनेविश्वातील एक उत्तम अभिनेते आहेत, ज्यांचे चित्रपट रिलीझ होण्यापूर्वीच चर्चेत येतात. अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम’ ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे, त्यामुळे अभिनेत्याचे चाहते खूप खूश आहेत. निर्मात्यांनी चाहत्यांचा आनंद द्विगुणित करत, चित्रपटाचे पहिले गाणे ‘पत्थला पत्थाला’ देखील रिलीझ केले आहे. मात्र या गाण्यामुळे कमल हसन कायदेशीर अडचणीत सापडला आहेत. होय, अभिनेत्यावर तक्रार दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
‘विक्रम’ चित्रपटातील ‘पथला पत्थाला’ हे गाणे कमल हासन यांनी लिहिले असून, याला आवाजही खुद्द अभिनेत्यानेच दिला आहे. या गाण्याला संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. रिपोर्टनुसार, ‘पथला पत्थाला’ या गाण्यासाठी कमल हासनविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेन्नई येथील पोलिस आयुक्त कार्यालयात अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पथला पत्थाला’ या गाण्यात केंद्र सरकारची खिल्ली उडवली जात असून, त्यामुळे लोकांमध्ये फूटही निर्माण होत असल्याचा दावा या सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. अशा परिस्थितीत गाण्यातील काही बोल काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. (vikram police complaint filed against kamal haasan)

‘या’ ओळींमुळे सुरू झाला विवाद
या गाण्यात काही ओळी आहेत, ज्यावर सामाजिक कार्यकर्ते सेल्वम यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी गाण्यातील ‘गज्जनाले कासिले कल्लालैयुम कासिले कैचल जोरम नेरैया वरुधु थिल्ललंगाडी थिल्लाले ओन्ड्रियाथिन थापले ओन्नियुम इल्ला इप्पले सावी इपो थिरुदन कैला थिल्लंगाडी थिल्लाले’ ही ओळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. यासोबतच सेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयात जाण्याबद्दलही वक्तव्य केले. त्यांच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास, चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालं गाणं
कमल हासनच्या ‘विक्रम’ चित्रपटातील हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युट्यूबवर अवघ्या दोन दिवसांत या गाण्याला १७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले, असून हा आकडा सातत्याने वाढत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post