Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड दिलीप कुमारांना गोळी मारायला सेटवर पोहचला होता ‘या’ अभिनेत्रीचा भाऊ, रागाच्या भरात स्वतःवरच…

दिलीप कुमारांना गोळी मारायला सेटवर पोहचला होता ‘या’ अभिनेत्रीचा भाऊ, रागाच्या भरात स्वतःवरच…

बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार (Dilip Kumar) हे असे कलाकार होते, जे आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्रात प्राण फुंकायचे. त्यांच्या स्टाईलवर आणि त्याच्या प्रत्येक अदावर चाहते फिदा होते. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन अनेक बॉलिवूड कलाकार सुपरस्टार झाले. दिलीप कुमार त्यांच्या उत्तम चित्रपटांसोबतच लव्ह लाईफमुळेही चर्चेत असायचे. अभिनेत्यावर अनेक सुंदरी मरत असत, पण दिलीप कुमार यांनी आयुष्यभर सायरा बानोला (Saira Banu) साथ देण्याचा निर्णय घेतला. दोघांची प्रेमकहाणी सर्वांनाच आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का, दिलीप कुमार यांचे हृदय पहिल्यांदा कोणासाठी धडधडत होते? चला दिलीप साहेबांच्या पहिल्या प्रेमाबद्दल जाणून घेऊया.

कामिनी कौशल होत्या दिलीप कुमारांचं पहिलं प्रेम
दिलीप कुमार यांचे पहिले प्रेम कामिनी कौशल होत्या. कामिनी या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. एक काळ असा होता की, दिलीप कुमार कामिनी कौशलच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले होते. कामिनीचेही त्यांच्यावर प्रेम होते. दोघांनाही लग्न करायचे होते. पण नंतर दोघांच्याही आयुष्यात असं काही घडलं की, त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले. दिलीप कुमार यांच्यावर लिहिलेल्या ‘दिलीप कुमार: पीअरलेस आयकॉन इन्स्पायरिंग जनरेशन’ या पुस्तकात अंशुला बाजपेयी आणि त्रिनेत्रा बाजपेयी यांनी या दोघांच्या प्रेमाविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. या पुस्तकानुसार कामिनी कौशल या दिलीप कुमार यांचे पहिले प्रेम होते. पण दिलीप कुमार यांनी कामिनीवर प्रेम असल्याची उघड कबुली कधी दिलीच नाही हेही खरे! (kamini kaushal and dilip kumar love story actress brother had reached the set to shoot dilip kumar)

‘या’ चित्रपटात केलंय एकत्र काम
दिलीप यांनी १९४४ मध्ये बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला होता. त्यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’ होता. त्याचवेळी कामिनी कौशलने १९४६ मध्ये आलेल्या ‘नीचा नगर’ या चित्रपटातून पदार्पण केले. १९४८ मध्ये आलेल्या ‘शहीद’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. कामिनीचे सौंदर्य पाहून दिलीप कुमार पहिल्याच नजरेत त्यांच्या प्रेमात पडले. या चित्रपटात काम करत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले, ते दोघांनाही कळले नाही. दिलीप कुमार आणि कामिनी यांनी ‘शहीद’, ‘शबनम’ आणि ‘नदिया के पार’ या तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. या तिन्ही चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान त्यांचे प्रेम फुलले आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले.

कामिनीच्या भावाची दिलीप कुमारला धमकी
कामिनी अगोदरच विवाहित होत्या, मात्र त्यांच्या पतीला त्यांच्या नात्यावर काही अडचण नव्हती. पण कामिनी कौशलचा भाऊ जो सैन्यात होता, त्याचा या नात्याला विरोध होता. प्रकरण इतके वाढले की, एके दिवशी तो बंदूक घेऊन दिलीप कुमार यांच्या शूटिंग सेटवर पोहोचला. यावेळी त्यांनी दिलीपकुमार कामिनीशी संबंध ठेवू नका आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतरही जेव्हा त्यांच्या प्रेमाच्या चर्चा थांबल्या नाहीत, तेव्हा कामिनीच्या भावाचा राग वाढला आणि एके दिवशी त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेने दिलीप कुमार आणि कामिनी दोघेही घाबरले आणि त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे दिलीप कुमार यांचे पहिले प्रेम अपूर्णच राहिले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा