Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड कंगना रणौतने पुन्हा साधला आलिया भट्टवर निशाणा; म्हणाली, ‘पापा खूप काही खरेदी करू शकतात, पण…’

कंगना रणौतने पुन्हा साधला आलिया भट्टवर निशाणा; म्हणाली, ‘पापा खूप काही खरेदी करू शकतात, पण…’

सध्या बॉलिवूडमधील बहुचर्चित असलेला आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) याआधीही बरेच काही बोलले होते. परंतु आता पुन्हा एकदा तिने यावर निशाणा साधला आहे. कंगनाने यामध्ये कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नसले, तरी बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या संदर्भात तिने सोशल मीडियावर ज्याप्रकारे स्त्रीप्रधान चित्रपटांची यादी शेअर केली आहे, त्यावरून केवळ आलियाच नाही तर तिचे वडील महेश भट्टही (Mahesh Bhatt) तिच्या निशाण्यावरती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वास्तविक झाले असे की, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेल हिने तिच्या इंस्टाग्रामवर मुख्य अभिनेत्रींसह महिला-आधारित एका दिवसात १० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेल्या चित्रपटांची यादी शेअर केली आहे. या यादीत कंगनाचा चित्रपट ‘मणिकर्णिका’ पहिल्या क्रमांकावर आहे, तर आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ चौथ्या क्रमांकावर आहे. यासोबत या यादीत इतर चित्रपटांचाही उल्लेख आहेच.

परंतु यासोबत याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पापा खूप काही खरेदी करू शकतात, पण आयुष्यातील सर्वात मौल्यवान वस्तू आपण स्वत: मिळवायच्या असतात.” त्यासोबत हात जोडत आणि लव्ह इमोजी शेअर करत यामध्ये कंगना रणौतला टॅग केले आहे. तर कंगनानेही आपल्या इंंस्टाग्राम स्टोरीवर ती स्वत: सुध्दा या गोष्टीला सहमत असल्याचे स्पष्ट केले आहे.

अशाप्रकारे पुन्हा एकदा कंगनाने नाव न घेता आलिया भट्टला आपल्या निशाण्यावरती साधले असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा