×

कंगना रणौतने आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’वर केली सडकून टीका; म्हणाली, ‘पप्पाची परी…’

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटांपेक्षा वाद विवादांमुळेच नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरुन ती नेहमीच कोणाला तरी टार्गेट करत थेट पंगा घेत असते. काही दिवसांपूर्वी तिने दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘गहराइयां’ चित्रपटाबद्दल जोरदार टीका केली होती, ज्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा कंगनाने आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे, ज्यामुळे चर्चा रंगली आहे.

कंगना रणौत सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक चित्रपटाला ट्रोल करण्याचे काम करत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणार्‍या कंगनाने आता आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाबद्दल असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे आता वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी कंगनाने या चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, “या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर २०० कोटी जळून राख होणार आहेत. ते सुद्धा एका पप्पांच्या परीसाठी कारण तिच्या पप्पांना रोमकॉम अभिनय करू शकते हे सिद्ध करायचे आहे. या चित्रपटाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे यामध्ये चुकीचे कलाकार घेतले आहेत. हे कधीही सुधरणार नाहीत.”

याआधीही एका लहान मुलीचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील डायलॉगवर अभिनय करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यावर कंगनाने जोरदार टीका केली होती. यावेळी तिने, या वयात ह्या मुलीने तोंडात बिडी पकडून असा अश्लील अभिनय करणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाबद्दलसुद्धा कंगनाने अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. अभिनेत्री कंगना रणौत आता लवकरच ‘लॉकअप’ कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या कार्यक्रमात आता कंगना काय वाद घालणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Latest Post