Monday, February 26, 2024

‘अशांची बरोबरी करण्याची गरज नाही’ म्हणत कंगना रणौतने केला पाश्चत्य संस्कृतीवर प्रहार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या बिनधास्त व्यक्तव्यांमुळे ओळखली जाते आणि गाजते. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक बेधडक आणि स्पष्टवक्ता स्त्री देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच तिचे मांडत असते. नुकताच तिने प्रियांका चोप्राच्या बॉलिवूड सोडण्याबद्दलच्या खुलासाला पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा तिने तिचे विचार तिच्या अंदाजमध्ये व्यक्त केले आहेत.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक ट्विट केले असून, या ट्विटमध्ये तिने पाश्चत्य संस्कृतीबद्दल भाष्य केले आहे. कंगनाने तिच्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला असून, यात तिने केंटकी विश्वविद्यालय मधील एक स्वीमर असणाऱ्या रिले गेम्सने एनसीएए आणि ट्रांसजेंडर स्वीमर असणाऱ्या लिया थॉमस विरोधात भाष्य केले. रिलेने एनसीएएने केलेल्या भेदभावाबद्दल सांगितले आणि तिला लिया थॉमससोबत एकच लोकर रूम शेअर करायला सांगण्यात आल्याचे देखील ती म्हणाली. लियाला तिने एक २२ वर्षाचा पुरुष असल्याचे देखील सांगितले.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कंगना रणौतने ट्विट करत लिहिले, “आपण आपल्या सभ्यतेचे पाश्चात्तीकरण होणे थांबवले पाहिजे. ते फक्त फाटलेले कपडे आणि हिप हॉप नाही तर ते अधिक खोलवर जात आहे. पश्चिमेत प्रत्येक तिसरा माणूस मानसोपचार घेत आहे. त्यांनी कुटुंबव्यवस्थेला संपूर्णपणे तोडून टाकले आहे. स्त्रीवादाच्या नावाखाली त्यांच्या स्त्रिया कौटुंबिक/आर्थिक अशा कोणत्याही पाठिंब्याशिवाय आपली मुले वाढवण्यासाठी धडपड करत आहेत.”

पुढच्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले, “आता त्या स्त्रिया पुन्हा आई होऊ इच्छित नाही आणि सोबतच हे नवीन लिंग नाटक तयार होत असून, ते तेथे एक महामारी बनले आहे. तो समाज उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जे मुलं आपल्या पालकांना आठवड्याच्या शेवटी जेवणासाठी भेटतात आणि बिल अर्धे अर्धे वाटतात. अशा लोकांची बरोबरीची करण्याची आम्हाला गरज नाही.”

दरम्यान कंगना सध्या तिच्या इमर्जन्सी सिनेमासाठी खूपच चर्चेत असून, तिने नुकतीच चंद्रमुखी २ ची शूटिंग पूर्ण केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिंहासनासाठी होणार महायुद्ध; ‘पोन्नियन सेल्वन 2’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऐश्वर्या राय ठरली लक्षवेधक

ये रिश्ता क्या कहलाता है? परिणीती चक्क पॅपराझींना टाळत बसली राघव चढ्ढाच्या गाडीत अन्…

हे देखील वाचा