Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड कंगना माफी मांगो, अभी के अभी…! अखेर माफी मागितल्यावरच झाली अभिनेत्रीची सुटका; पाहा कुठे घडला ‘हा’ प्रकार

कंगना माफी मांगो, अभी के अभी…! अखेर माफी मागितल्यावरच झाली अभिनेत्रीची सुटका; पाहा कुठे घडला ‘हा’ प्रकार

बॉलिवूड कलाकार हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. परंतु बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री जी नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. तुम्हाला अंदाज आला असेल आपण कोणाबद्दल बोलत आहोत ते. ती अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ती नेहमीच समाजातील विविध विषयांवर तिचे मत व्यक्त करत असते. मागील काही दिवसांपूर्वी तिने शेतकरी आंदोलनावर तिचे मत व्यक्त केले होते.

अशातच कंगनाला शुक्रवारी (०३ डिसेंबर) रोजी रोपड प्लाझा येथे शेतकऱ्यांच्या रागाचा सामना करावा लागला आहे. कंगनाने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ती मनालीवरून चंदीगढला जात होती, तेव्हा चंदीगढ उना नॅशनल हायवेवर काही शेतकऱ्यांनी तिला अडवले. तिने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “मी जसे पंजाबमध्ये पाऊल ठेवले तसे या घोळक्याने माझ्यावर हल्ला केला. ते लोक असे म्हणत होते की, ते शेतकरी आहेत.” (Kangana Ranaut convey was stopped by farmers in panjab)

https://www.facebook.com/KanganaRanaut/posts/454903935982141

कंगनाने सांगितले की, ते लोक तिला माफी मागायला सांगत होते. या गर्दीने तब्बल एक तास तिला अडवले होते. तिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्या शेतकऱ्यांसोबत अनेक पोलीस देखील तिथे उपस्थित होते. या गर्दीने कंगनाची गाडी पुढे जाऊनच दिली नाही. ते लोक तिला माफी मागायला सांगत होते. सगळे शेतकरी एकत्र येणार आहेत या गोष्टीचा सुगावा लागताच पोलिसांनी टोलपासून २०० मीटर आधीच कंगनाची गाडी मोरींडा गावात घुसवली. गावातून ती पुन्हा एकदा हायवेला आली. सगळे शेतकरी तिला विरोध करण्यासाठी एकत्र आले होते.

या वेळी एकत्र जमलेले हे लोक म्हणाले की, शीख महिलांची माफी मागा. यावेळी सगळ्यांना तिला घेरले होते. त्यावेळी तिच्या गाडीच्या पुढे सिक्युरिटी होती, तर गाडीमागे पंजाब पोलीस होते. तरीही देखील ही गर्दी रोखणे अवघड झाले होते. लोक वारंवार हीच मागणी करत होते की, कंगनाने गाडीतून बाहेर यावे आणि महिलांची माफी मागावी.

या व्हिडिओमध्ये कंगना म्हणते की, “भर रस्त्यावर मॉब लिचिंग होत आहे. मी आताच हिमाचलवरून आले आहे, कारण माझी फ्लाईट रद्द झाली आहे. आता इथे पंजाबमध्ये येताच या गर्दीने मला थांबवले आहे. ते स्वतः शेतकरी आहेत असे सांगत आहेत. खराब शिव्या देत आहेत. जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या देशात अशी मॉब लिचींग होत आहे. जर आज माझ्यासोबत सिक्युरिटी नसती, तर आज माझे काय झाले असते? हे खूपच भयंकर आहे. हा कसला व्यवहार आहे? एवढे पोलीस असूनही मला जाता येत नव्हते. अनेक लोक माझ्या नावावर राजकारण करत आहेत. याचा परिणाम म्हणजे या गर्दीने माझ्या गाडीला घेरले होते.”

कंगनाने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात ती तिथे गर्दीत उपस्थित असणाऱ्या. महिलांशी बोलताना दिसत आहे. कंगना त्यांना म्हणते की, “मी तुमच्यासाठी ते सगळं बोलले नव्हते. ते की शाहीन बाग महिलांसाठी बोलले होते.”

परंतु त्या महिला कंगनाचे काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. तिने जेव्हा महिलांची माफी मागितली, तेव्हा तिला तेथून सोडण्यात आले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा