Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन लॉकअप : दिग्दर्शकासोबत अफेअर, मग प्रेग्नन्सी मंदाना करीमीने वेदनादायक अफेअरचा केला खुलासा, कंगनालाही अश्रू अनावर

लॉकअप : दिग्दर्शकासोबत अफेअर, मग प्रेग्नन्सी मंदाना करीमीने वेदनादायक अफेअरचा केला खुलासा, कंगनालाही अश्रू अनावर

कंगना राणौतच्या (Kangana Ranaut)  ‘लॉकअप’ या कार्यक्रमाने सध्या खळबळ उडवून दिली आहे. हा कार्यक्रम सुरू होण्याआधी एकता कपूरने प्रेक्षकांना वचन दिले होते की शोमध्ये तिला कोणत्याही वादाची कमतरता भासणार नाही आणि ती तिचे वचन पूर्ण करताना दिसत आहे. आत्तापर्यंत अनेक स्पर्धकांनी त्यांच्या अनेक खुलाश्यांनी प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. आता मंदाना करीमीनेही तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर, ती एका दिग्दर्शकाच्या संपर्कात आली, ज्यांच्यासोबत तिने फॅमिली प्लॅनिंगही केले होते. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

कंगणाच्या लॉकअप कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कार्यक्रमात सध्या अनेक खुलासे होताना दिसत आहेत. कार्यक्रमात मंंदाना करिमीनेही तिच्या नात्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. या नात्याबद्दल खुलासा करताना मंदाना म्हणाली की, “यावेळी मी माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर मात देत होते, माझ्या पतीपासून वेगळे होते. याच काळात एका दिग्दर्शकासोबत माझे नाते तयार झाले. मी एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये होते जो महिला हक्कांबद्दल बोलत होता. तो अनेकांसाठी आदर्श आहे . आम्ही प्रेग्नेंसीचा प्लॅन केला होता पण जेव्हा ते घडलं…” हे सांगताच मंदाना रडू लागली.

मंदानाच्या या खुलाशाने जवळपास बसलेले सर्व स्पर्धक भावूक झालेले पहायला मिळाले. मंदानाचे हे दुःख समोर आल्यानंतर होस्ट कंगना रणौतही खूप भावूक दिसली. कंगना रणौत इतकी भावूक झाली की तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत. मंदानाने 2017 मध्ये बिझनेसमन गौरव गुप्तासोबत लग्न केले होते, ज्यांच्यापासून ती 5 महिन्यांनंतर वेगळी झाली होती. तिने गौरव गुप्ताविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हाही दाखल केला होता. नुकतेच मुनव्वर फारुकी यानेही आपण विवाहित असून त्याला एक मूल असल्याचा खुलासा करून प्रेक्षकांना चकित केले आहे. स्वत:ला  वाचवण्यासाठी मुनव्वरने सांगितले की, मी लहान असतानाच लग्न केले होते. सुरुवातीला मुनव्वरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यास नकार दिला, पण जेव्हा होस्ट कंगनाने त्याला समजावले तेव्हा त्याने मौन तोडले आणि आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना मुनव्वरने सांगितले की, “तो आणि त्याची पत्नी गेल्या दीड वर्षांपासून एकत्र नाहीत. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. त्यामुळेच तो या विषयावर जाहीरपणे बोलत नाही.” मुनव्वरच्या या खुलाशानंतर नुकतेच त्याच्यावर प्रेम व्यक्त करणारी अंजली अरोराही मुनव्वरच्या खुलाशानंतर पूर्णपणे स्तब्ध झाली होती. त्याचवेळी, होस्ट कंगनाने मुनावरचे या प्रकरणावर खुलेपणाने बोलल्याबद्दल कौतुक केले. अशा विविध कारणांमुळे हा कार्यक्रम सध्या चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा