भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक दु:खद बातमी समोर येत आहे. शुक्रवार (दि, 30 डिसेंबर) रोजी नरेंद्र मोदींची आई हिराबेन मोदी यांचे 100 व्या वर्षी सकाळी निधन झाले आहे. मंगळवार (दि, 27 डिसेंबर) रोजी त्यांची तब्येत खालावली होती त्यामुळे त्यांना अहमदाबादमधील यूएन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांनी अखरेचा श्वास घेतला. यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिने मोदीजींच्या आईला श्रद्धांजली वीहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांचे निधन झाले असून अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत हिरा बेन आणि नरेंद्र मोदी यांचा एकत्र फोटो शेअर करत त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “ईश्वर पंतप्रधानमंत्रीजींना या कठीण परिस्थितीत धैर्य आणि शांती दे, ओम शांती.” अशाप्राकारे कंगनाने हिरबेन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
कंगनाच नाही तर इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटींनी पीएम मोदींना सांत्वना देत हिराबेन मोदींना श्रद्धांजली वाहिली आहे. हिराबोन मोदी यांनी वयाच्या 100व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अशामध्ये नरेंद्र मोदी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यासाठी हा क्षण खूपच दु:खाचा असून अनेकजन त्यांना सांत्वना देत त्यांच्या दु:खामध्ये सहभागी होत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तीचा नवीन चित्रपट ‘धाकड’ प्रदर्शित झाला होता. मात्र, बॉक्सऑफिसवर चित्रपट फार काही कामगिरी करु शकला नाही. यानंतर तिचा आगामी येणार चित्रपट ‘इमरजेंसी’ (Emergency) मध्ये कंगना जिवतोड कष्ट घेताना दिसून येत आहे. कंगना या चित्रपटामध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शनाचेही काम करत आहे. त्याशिवाय ‘इमरजेंसी’ चित्रपटामध्ये कंगना पूर्व प्रधामनंत्री इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
भारीच की! मिथिलाने शेअर केले भन्नाट फोटो, एकदा पाहाच
एका रात्रीत स्टार झालेल्या ‘आशिकी गर्ल’चे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्यासाठी सेक्स कधीच…’