बॉलिवूडची दबंग अभिनेत्री म्हणून कंगना रनौत ओळखली जाते. कंगनाने अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे. असे असले तरी तिला तिच्या बेधक, बिनधास्त व्यक्तव्यांमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे जास्तच प्रसिद्धी मिळते. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक सिनेमा असतो जो, करून कलाकरांना ते कलाकार असल्याचे एक वेगळेच समाधान मिळते. कंगनाने देखील तिच्या अशाच एका सिनेमाबद्दल सांगितले आहे.
कंगनाची करिअरमधील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि बहुप्रतिक्षित असा ‘थलाइवी’ हा सिनेमा करून तिला आयुष्यभराचा अनुभव आणि समाधान मिळाले आहे. या सिनेमातून तिला तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्याच्या सर्व बाजुंनी अभ्यास करून त्यांचे पात्र पडद्यावर साकारायची संधी मिळाली. या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना कंगना म्हणाली, “‘थलाइवी’ हा चित्रपट माझ्यासाठी नक्कीच आयुष्य बदलणारा अनुभव होता. कारण यामुळे मला बर्याच काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या. अम्मा सारख्या मोठ्या, सशक्त आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे चित्रण करायला मिळणे माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता.”
या दिवंगत राजकीय नेत्यांच्या असलेल्या विविध पैलूंच्या प्रतिभेचे कौतुक करताना कंगना म्हणाली, “जया अम्मा म्हणजे जयललिता या उत्तम भरतनाट्यम डान्सर होत्या. त्यांचे मुख्य काम चित्रपटांमध्ये काम करणे होते. नंतर त्या राजकारणात आल्या. त्यांची तुलना कोणाशी करता येणार नाही.” ‘थलाइवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ए एल विजय यांनी केले तर नासर, भाग्यश्री, राजा अर्जुन, मधु, थम्बी रमैली, सामना कासिम, आणि समुथिकानी यांनी या सिनेमात भूमिका साकारल्या होत्या.
कंगना रनौतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अभिनेत्रीने आधीच जाहीर केली होती. पण आता ही बातमी येत आहे की, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना रनौतचा ‘धाकड’ या चित्रपटाची रिलीज डेट एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट ८ एप्रिल २०२२ मध्ये रिलीज होणार होता पण तो चित्रपट २० मे २०२२ मध्ये रिलीज होणार आहे.
‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ईशा तलवार आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण, सलमानसोबतही केले आहे काम
अभ्यास करताना रडणारी चिमुकली आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; पाहून चाहतेही पडले गोंधळात